32 वर्षांनंतर गावाकडे आला अन्‌ आश्चर्यस्‍पदरित्‍या मृतदेह आढळला!; मेहकर तालुक्‍यातील ते गूढ कायमच!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 18 मार्चला मेहकर तालुक्यातील पाथर्डी घाटात कुजलेला मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यात जानेफळ पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथील सुरेश अमृता पदमने (45) यांचा असल्याचे तपासात समोर आले आहे. वन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ 100 मीटर अंतरावर हा मृतदेह आढळला होता. वनरक्षक वसंत महादेव …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 18 मार्चला मेहकर तालुक्यातील पाथर्डी घाटात कुजलेला मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यात जानेफळ पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथील सुरेश अमृता पदमने (45) यांचा असल्याचे तपासात समोर आले आहे.

वन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ 100 मीटर अंतरावर हा मृतदेह आढळला होता. वनरक्षक वसंत महादेव फुके व वनमजुर वसुदेव त्र्यंबक राज हे वरवंड बिटमध्ये गस्त घालत असताना सायंकाळी 6 सुमारास त्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी त्या दिशेने जाऊन बघितले असता कुजलेला मृतदेह आढळला. जानेफळ पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. सुरेश पदमने गेल्या 32 वर्षांपासून मुंबई येथे राहत होते. गावाकडच्या शेतातील विहिरीचे बांधकाम करण्यासाठी महिनाभरापूर्वी आले होते. मात्र त्यांचा मृतदेह पाथर्डी घाटात आढळून येण्याचे कारण अजूनही निष्पन्न झाले नाही.