321 पॉझिटिव्ह, 16 हजारांवर रुग्णांची कोरोनावर मात

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः लॉकडाउन शिथिल झाल्यावर मंगळवारी, 2 मार्चला कोरोनाबाधितांचा आकडा सव्वा चारशेच्या घरात गेला होता. त्या तुलनेत आज 3 मार्चला हा आकडा 321 पर्यंत खाली आला आहे. तसेच 1989 निगेटिव्ह अहवाल आले हाच काय तो दिलासा ठरलाय!आरटीपीसीआर 1281 च्या तुलनेत रॅपिड 881 चा वेग वाढविण्यात आला असतानाच एकूण 2261 …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा )ः लॉकडाउन शिथिल झाल्यावर मंगळवारी, 2 मार्चला कोरोनाबाधितांचा आकडा सव्वा चारशेच्या घरात गेला होता. त्या तुलनेत आज 3 मार्चला हा आकडा 321 पर्यंत खाली आला आहे. तसेच 1989 निगेटिव्ह अहवाल आले हाच काय तो दिलासा ठरलाय!
आरटीपीसीआर 1281 च्या तुलनेत रॅपिड 881 चा वेग वाढविण्यात आला असतानाच एकूण 2261 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी 2338 जणांचे अहवाल मिळाले. गत 24 तासांत जिल्ह्यात 321 बाधित रुग्ण आढळले. पॉझिटिव्हीटी रेट 13.72 टक्के पर्यंत गेला आहे. आजअखेर 1 लाख 73 हजार 864 नमुने संकलित करून आरोग्य यंत्रणांनी सुमारे पावणे दोन लाखांचा मोठा पल्ला गाठला. त्यातुलनेत 19 हजार 534 जण पॉझिटिव्ह झाले. यातील 16 हजार 712 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 2627 रुग्ण उपचार घेत आहेत. बळींची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. याचा दर 11,23 टक्के असा आहे.