4 ‘एपीआय’ झाले ‘पीआय’!; 3 अधिकारी जाणार मुंबईला..!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 4 सहायक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील 438 नि:शस्र सहायक पोलीस निरीक्षकांना नि:शस्त्र पोलीस निरीक्षक पदी बढती दिली आहे. यापूर्वी अंढेरा पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळलेले आणि गेल्याच महिन्यात जिल्हा नियंत्रण कक्षात रुजू झालेले नरेंद्र ठाकरे यांना पोलीस निरीक्षकपदी बढती …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 4 सहायक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक म्‍हणून पदोन्‍नती मिळाली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील 438 नि:शस्र सहायक पोलीस निरीक्षकांना नि:शस्‍त्र पोलीस निरीक्षक पदी बढती दिली आहे.

यापूर्वी अंढेरा पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळलेले आणि गेल्याच महिन्यात जिल्हा नियंत्रण कक्षात रुजू झालेले नरेंद्र ठाकरे यांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली असून त्यांच्याकडे जिल्हा जातपडताळणी समितीचा भार सोपविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले श्रीकांत निचळ यांना पोलीस निरीक्षक करण्यात आले असून, त्यांना मुबई शहरात पाठवण्यात येणार आहे. तसेच अमर सुरेशराव चोरे आणि आनंद गंगाधर कांबळे या अधिकाऱ्यांना सुद्धा पोलीस निरीक्षक पदी बढती देऊन मुंबई शहर येथे पाठविण्यात येणार आहे.