4 विवाहिता, 1 तरुणी, 1 तरुण जिल्ह्यातून गायब!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून 4 विवाहिता, 1 तरुणी आणि 1 तरुण असे 6 जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी त्या त्या पोलीस ठाण्यांत गेल्या 2 दिवसांत करण्यात आल्या आहेत. बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील वैंकीनाथनगरात राहणारी सौ. नलिनी त्र्यंबक टेकाळे (32) ही विवाहिता 21 मे रोजी सकाळी 10 च्या सुमारास घरात कोणाला काही न सांगता निघून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून 4 विवाहिता, 1 तरुणी आणि 1 तरुण असे 6 जण बेपत्ता झाल्‍याच्‍या तक्रारी त्‍या त्‍या पोलीस ठाण्यांत गेल्या 2 दिवसांत करण्यात आल्‍या आहेत.

बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील वैंकीनाथनगरात राहणारी सौ. नलिनी त्र्यंबक टेकाळे (32) ही विवाहिता 21 मे रोजी सकाळी 10 च्या सुमारास घरात कोणाला काही न सांगता निघून गेली आहे. तिचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला; परंतु मिळून न आल्याने तिचे  वडील बबनराव सखाराम थिगळे (रा. कटोडा ता. चिखली) यांनी आज बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तिच्या पतीने दारु पिऊन मारहाण केल्याने रागाच्या भरात ती निघून गेली आहे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. रंग गोरा, उंची 5 फूट11 इंच, चेहरा लांबट, सडपातळ बांधा, अंगात साडी ब्लाऊज अशा वर्णनाची महिला कुठे आढळल्यास शहर पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपास एएसआय नामदेव खवले करत आहेत.

खामगाव शहरातील शंकरनगर येथील 32 वर्षीय सौ. विद्या मंगेश वाकोडे ही विवाहिता घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार खामगाव शहर पोलीस ठाण्यात आज दाखल झाली. लोणार शहरातूनही 22 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाली असून, सौ. पल्लवी विजय पोघे ही झोपडपट्टी भागात राहत होती. ती घरात कुणाला काही न सांगता निघून गेली. लोणार पोलीस तिचा शोध घेत आहेत. देऊळगाव घाट (ता. बुलडाणा) येथून 23 वर्षीय विवाहिता आपल्या 2 वर्षांच्‍या चिमुकल्यासह गायब झाली आहे. आस्ता परवीन रिजवान खान असे या महिलेचे नाव आहे. ती जोयब खान या आपल्या चिमुकल्यासह घरातून निघून गेली. तिचा आणि बाळाचा शोध बुलडाणा ग्रामीण पोलीस घेत आहेत. नांदुरा शहरातून 23 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. प्रगती संजय भोपळे ही घरात कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार नांदुरा पोलिसांत करण्यात आली आहे. लोणार तालुक्‍यातील गायखेड येथून 28 वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे.  कडूबा लक्ष्मण तेजनकर असे त्‍याचे नाव आहे. त्‍याचाही शोध लोणार पोलीस घेत आहेत.