4 हजारांसाठी गमावले 42 हजार, शेतकऱ्याला ऑनलाइन गंडा!; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुम्हाला कॅशबॅक मिळाला, बक्षीस लागले, तुमच्या कार्डची मुदत संपली असे म्हणून गंडवल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार करताना किमान काळजी घेण्याची गरज असताना अनेक जण, त्यात अगदी सुशिक्षित मंडळीही मोहापायी नासमज होतात आणि गंडवले जातात. कालच खामगावमध्ये एका सैनिकाला असाच गंडा घातल्याची घटना ताजी असताना …
 
4 हजारांसाठी गमावले 42 हजार, शेतकऱ्याला ऑनलाइन गंडा!; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुम्‍हाला कॅशबॅक मिळाला, बक्षीस लागले, तुमच्‍या कार्डची मुदत संपली असे म्‍हणून गंडवल्याच्‍या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोणतेही आर्थिक व्‍यवहार करताना किमान काळजी घेण्याची गरज असताना अनेक जण, त्‍यात अगदी सुशिक्षित मंडळीही मोहापायी नासमज होतात आणि गंडवले जातात. कालच खामगावमध्ये एका सैनिकाला असाच गंडा घातल्याची घटना ताजी असताना संग्रामपूर तालुक्‍यातही एका शेतकऱ्याला कॅशबॅक मिळाल्‍याच्‍या नावाखाली 42 हजार रुपयांनी गंडवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या शेतकऱ्याने तक्रार दिल्याने आज, 3 जून रोजी दुपारी गुन्‍हा दाखल करण्यात आला.

संग्रामपूर तालुक्यातील भोन येथील रहिवासी असलेल्या शिवाजी तुळशीराम लोणकर (३२) या शेतकऱ्याला ९८८३९१८४४१ व ९२८४९७३५२१ या दोन नंबरवरून फोन आणि मेसेज आले. तुम्हाला ३९९९ चे कॅशबॅक मिळाले त्याकरिता नोटिफिकेशन आयकॉनवर बटन दाबून क्लिक करा, असे त्‍यांना सांगण्यात आले. लोणकर यांनी नोटिफिकेशन आयकॉनवर बटन दाबून क्लिक केले.

क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून ४२ हजार ११६ रुपये कटले. फोन पे या मोबाइल ॲपचा वापर करून ही फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर लोणकर यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी करत आहेत.