4 हजार जणांनी चिखलीत घेतली कोरोना लस; लसीकरणाचे आमदार श्वेताताई महाले यांचे आवाहन

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी रुग्णालयात मोफत तर खासगी रुग्णालयात माफक दरात उपलब्ध करून दिली आहे. चिखली शहरात 4 हजार 83 नागरिकांचा डोस पूर्ण झाला आहे तर 1874 नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. चालू महिन्यात 374 जणांनांचा दुसरा डोस पूर्ण झाला. लस सुरक्षित असून, घेतलेल्यांना कुठलाच त्रास …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  कोरोना लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी रुग्णालयात मोफत तर खासगी रुग्णालयात माफक दरात उपलब्ध करून दिली आहे. चिखली शहरात 4 हजार 83 नागरिकांचा डोस पूर्ण झाला आहे तर 1874 नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. चालू महिन्यात 374 जणांनांचा दुसरा डोस पूर्ण झाला. लस सुरक्षित असून, घेतलेल्यांना कुठलाच त्रास झालेला नाही.

सद्यःस्थितीत 60 वर्षांवरील प्रत्येकाला, तसेच 45 ते 60 वर्षापर्यंतच्‍या दुर्धर आजार ग्रस्त नागरिकांना लस देण्यात येत असून, सर्व पात्र नागरिकांनी लस घ्यावी. तोंडावर मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करून कोरोनाला प्रतिबंध करण्याचे  आवाहन आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली तालुक्यातील सरकारी लसीकरण केंद्राला भेटी देऊन घेतलेल्या आढावा दरम्यान केले. यावेळी पंडितराव देशमुख (भाजपा शहराध्यक्ष), डॉ. कृष्णकुमार सपकाळ (तालुकाध्यक्ष), आरोग्य सभापती विजय नकवाल , बांधकाम सभापती शैलेश बाहेती, नगरसेवक गोविंद देव्हडे, नगरसेवक सुभाष अप्पा झगडे, संजय महाले (जिल्हा सचिव भाजपा), जितेंद्र कलंत्री (पंचायत समिती सदस्य), प्रभूकाका बाहेकर, मधुकर बाहेकर, प्रा. वीरेंद्र वानखेडे (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), अंकुश तायडे, गजानन दुधाळे, प्रशांत पाखरे, योगेश जुमडे, गाजीबाबा, राजकुमार राठी, महादेव ठाकरे, डिगांबर राउत, गजानन काळे, गजानन शेळके, जमीर खाँ पठाण, भीमराव अंभोरे, अशोक हतागळे, मुरली लाड, हेमंत पारखे आदींसह वैद्यकीय अधीक्षक डॉ.अफशा खान, डॉ. खरपास, डॉ. गारुडे लसीकरण नोडल अधिकारी डॉ. बेग, डॉ. प्रदीप मेहेत्रे डॉ. प्रिती रिंढे, अनिल मोरे, प्रभाकर डुकरे, विजय डुकरे, डॉ. अक्षय माळेकर, मनीषा येवले, बबिता जाधव, स्वाती जाधव ,मनीषा गिरी, मेघा पारसकर,वैशाली वानखेडे, सरस्वती सोनुने व इतर ग्रामीण रुग्णालयीन कर्मचारी उपस्‍थित होते.