43 कोरोनाबाधित आढळल्‍याने छोटेसे उटी खुर्द हादरले!; जिल्ह्यात 5 बळी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 31 मार्चला कोरोनाने तब्बल 5 बळी घेतले आहेत. उपचारादरम्यान महीमळ (ता. चिखली) येथील 65 वर्षीय व 78 वर्षीय पुरुष, निमगाव (ता. नांदुरा) येथील 79 वर्षीय महिला, आदर्शनगर, खामगाव येथील 74 वर्षीय पुरुष, वालसावंगी (ता. भोकरदन जि. जालना) येथील 68 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात नव्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 31 मार्चला कोरोनाने तब्‍बल  5 बळी घेतले आहेत. उपचारादरम्यान महीमळ (ता. चिखली) येथील 65 वर्षीय व 78 वर्षीय पुरुष, निमगाव (ता. नांदुरा) येथील 79 वर्षीय महिला, आदर्शनगर, खामगाव येथील 74 वर्षीय पुरुष, वालसावंगी (ता. भोकरदन जि. जालना) येथील 68 वर्षीय महिला रुग्‍णाचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात नव्‍या 630 बाधितांची भर पडली असून, 886 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. धक्‍कादायक बाब अशी की, अवघी काहीशे लोकसंख्या असलेल्या उटी खुर्द (ता. जळगाव जामोद) येथे कोरोनाने हादरा दिला असून, तब्‍बल 43 रुग्‍ण या गावात आढळल्‍याने यंत्रणाही भांबावून गेली आहे. या गावात तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4553 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3923 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 630 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 366 व रॅपीड टेस्टमधील 264 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 387 तर रॅपिड टेस्टमधील 3536 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 65, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 2,  रायपूर 1, डोंगरखंडाळा 1, पाडळी 2,  सागवन 3, येळगाव 1, देऊळघाट 1, खामगाव शहर : 65, खामगाव तालुका : सज्जनपुरी 3, पिंपळगाव राजा 6, हिंगणा 1, पिंप्री कोरडे 4, गणेशपूर 1, शिरसगाव दे 1, जळका 2, राहुड 1, पळशी 1, आमसरी 3, आडगाव 1, टेंभुर्णा 1, घाटपुरी 9, पारखेड 1, ढोरपगाव 2, बोरजवळा 1,   सुटाळा 7, गोंधनपूर 1, शेगाव शहर : 8,  शेगाव तालुका : गव्हाण 1, पहुरजिरा 1, जळगाव जामोद शहर : 11, जळगाव जामोद तालुका : वडशिंगी 5, काजेगाव 3, सावरगाव 13, खेर्डा बुद्रूक 7, रूधाना 1, जामोद 1, आसलगाव 5, वाडी खुर्द 2,  पिंपळगाव काळे 1,  सुलज 2,  उटी खुर्द 43, धानोरा 1, संग्रामपूर शहर : 3, संग्रामपूर तालुका : काटेल 8, खिरोडा 1, रोहणा 1, टुनकी 1, पातुर्डा 1, वरवट 3, काकडेश्वर 1, कोलद 1, एकलारा 1, सायखेड 1, बोरखेड 1, बावनबीर 1, सगोडा 1, सोनाळा 3,  उकडगा 1, कथरगाव 1, मनार्डी 1, असोदा 1, काकनवाडा 1, बोडखा 1, वानखेड 2, चिखली शहर : 21,  चिखली तालुका : मंगरूळ नवघरे 2, अमडापूर 1, सवणा 1, एकलारा 3, मुरादपूर 1, खैरव 1, मालखेड 2, गांगलगाव 1, चंदनपूर 1, शेलगाव आटोळ 1, करवंड 1, माळविहीर 1, मोताळा शहर : 4,  मोताळा तालुका : सांगळद 2, रोहिणखेड 1, अंत्री 1, बोराखेडी 4, पोफळी 1,  काबरखेड 2, कोथळी 4, खरबडी 1, आव्हा 2, धामणगाव देशमुख 2, परडा 3, शिरवा 1, धामणगाव बढे 2, शेलापूर 3, पिंप्री गवळी 2,  मेहकर शहर : 12, मेहकर तालुका : अंजनी खुर्द 1, अंत्री देशमुख 1, डोणगाव 2, लव्हाळा 1,  लोणी गवळी 1, उकळी 1, नांदुरा शहर : 10, नांदुरा तालुका : निमगाव 2, सावरगाव 5, अवधा 2, खुमगाव 8, नवीन येरळी 1,  वडाळी 1, धाडी खुर्द 1, भोरवट 1, पातोंडा 1, चांदुरबिस्वा 1, खैरा 1, टाकरखेड 1,   मलकापूर शहर : 28, मलकापूर तालुका : दसरखेड 19, धरणगाव 1, कुंड बुद्रूक 6, दुधलगाव 1, दाताळा 1, पिंपळखुटा 1, घिर्णी 1, नरवेल 5, विवरा 2, देऊळगाव राजा शहर : 33,  देऊळगाव राजा तालुका : गारखेडा 1, असोला जहाँगिर 1,  जांभोरा 2, चिंचाली बुद्रूक 1, सावखेड भोई 2, तुळजापूर 1, टाकरखेड भागीले 1, गिरोली खुर्द 1,  देवखेड 1, दगडवाडी 1, निमखेड 1, सातेगाव 2, मंडपगाव 1, नागणगाव 1,जळगाव 1, देऊळगाव मही 1,  सिंदखेड राजा शहर : 10,  सिंदखेड राजा तालुका : किनगाव राजा 1, पिंपळगाव 2, सोयंदेव 4, देवखेड 1, सवडत 3, भोसा 1, शेंदुर्जन 2, आंबेवाडी 1, शिवणी 1, उगला 1, कडपंची 1, वाघोरा 2, पळसखेड 1, मलकापूर पांग्रा 1, दुसरबीड 3, हनवतखेड 1,  शिंदी 1, कंडारी 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : महारचिकना 1, गनपूर 1,देऊळगाव कोळ 1, पळसखेड जहाँगिर 2, वढव 2, परजिल्हा अकोला 1, कुऱ्हा ता. मुक्ताईनगर 1, जाफराबाद जि. जालना 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 630 रुग्ण आढळले आहेत.

बळींचा आकडा 260 वर

जिल्ह्यात कोविड निदानासाठी 3196 नमुने घेण्यात आले आहेत. तसेच विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरमधून 886 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 218713 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 31990 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 218713 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 37744 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 31910 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 5494 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 260 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.