47 गोवंश ट्रकमध्ये कोंबून भरले होते; 5 जनावरांचा मृत्‍यू; बुलडाणा एलसीबीने चौघांच्‍या मोताळ्याजवळ आवळल्‍या मुसक्या

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 47 गोवंशांना एकाच ट्रकमध्ये कोंबून वाहतूक करणाऱ्या ट्रकला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने पकडले. मध्यप्रदेशातील चौघांना अटक करण्यात आली आहे. आज, 18 एप्रिलच्या पहाटे 1 च्या सुमारास ही कारवाई मोताळा – नांदुरा रोडवर करण्यात आली.मध्यप्रदेशातून गोवंशानी भरलेला ट्रक मोताळा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यावरून एलसीबीने …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  47 गोवंशांना एकाच ट्रकमध्ये कोंबून वाहतूक करणाऱ्या ट्रकला बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या  (एलसीबी) पथकाने पकडले. मध्यप्रदेशातील चौघांना अटक करण्यात आली आहे. आज, 18 एप्रिलच्‍या पहाटे 1 च्या सुमारास ही कारवाई मोताळा – नांदुरा रोडवर  करण्यात आली.
मध्यप्रदेशातून गोवंशानी भरलेला ट्रक मोताळा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यावरून एलसीबीने सापळा रचला होता. पहाटे एकच्या सुमारास एक ट्रक मलकापूरहून मोताळ्याकडे येताना दिसला. त्याला अडवून तपासणी केली असता त्यात 47 गोवंश कोंबून भरलेल्या अवस्थेत आढळले. श्वास न मिळाल्याने गुदमरून पाच जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ट्रकचालक आणि त्याच्यासोबतच्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. ट्रकचालक अयुब खान कुदरत खान (52, रा. करोड पुलिया भोपाळ), इरफान मुन्ना (रा. निहारगड), फिरोज मुबारक (रा. निहारगड), फिरोज जकिर मुलतानी (सर्व रा. मुलतानपुरा, मनसरोवर, मध्यप्रदेश) या चौघांविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 47 गोवंश, 2 मोबाइल, एक 12 टायरी ट्रक असा एकूण 18 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवंशाला संगोपनासाठी श्री हरी गौशाला, बेलाड ता. मलकापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने ‘एलसीबी’चे सहायक पोलीस निरिक्षक नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरिक्षक अनिल भुसारी, पोलीस अंमलदार मिलिंद सोनोने, गजानन आहेर, सतीश जाधव, गजानन गोरले, विजय वारुळे, विजय पैठणे यांनी केली.