498 ग्रामपंचायतींसाठी 77 टक्के मतदान; बुलडाणा लाईव्हचे भाकीत 99.99 टक्के ठरले अचूक! मध्यरात्री अंतिम मतदान झाले निश्‍चित

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानात ग्रामीण मतदारांचा उत्साह दिसून आला होता, या मतदानाची अंतिम आकडेवारी फायनल होण्यास 15 जानेवारीची मध्यरात्र उलटली! जिल्ह्यात सरासरी 77.36 मतदान झाले असून, बुलडाणा लाईव्ह ने 76 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. यामुळे बुलडाणा लाईव्हचे भाकीत जवळपास अचूक ठरले आहे. …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानात ग्रामीण मतदारांचा उत्साह दिसून आला होता, या मतदानाची अंतिम आकडेवारी फायनल होण्यास 15 जानेवारीची मध्यरात्र उलटली! जिल्ह्यात सरासरी 77.36 मतदान झाले असून, बुलडाणा लाईव्ह ने 76 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. यामुळे बुलडाणा लाईव्हचे भाकीत जवळपास अचूक ठरले आहे.

शुक्रवारी सकाळी 7ः30 वाजता 1796 मतदान केंद्रांवर मतदानास प्रारंभ झाला. दुपारी 3ः30 वाजेपर्यंतच मतदानाची टक्केवारी 64 टक्क्यांच्या घरात पोहोचल्याने उत्साही मतदान होणार असल्याचे भाकीत देखील बुलडाणा लाईव्हने वर्तविले होते. यानंतर अखेरच्या टप्प्यात मतदान केंद्रांना अक्षरशः मतदारांचा गराडा पडल्याचे दिसून आल्याने अंतिम आकडा 75 टक्क्यांच्या पल्याड गेल्याचा अंदाज बुलडाणा लाईव्हने ठळकपणे व कोणतेही प्रश्‍नचिन्ह न उभारता वर्तविले होते. ते जवळपास अचूक ठरले. अंतिम मतदानाची आकडेमोड मध्यरात्री साडेबारानंतर स्पष्ट झाली. यानुसार जिल्ह्यातील एकूण 9 लाख 70 हजार 667 पैकी 7 लाख 50 हजार 929 मतदारांनी मतदानाचे कर्तव्य निभावले. यामध्ये 3 लाख 94 हजार 894 (79.56 टक्के) पुरुष तर 3 लाख 56 हजार 36( 75.06 टक्के) महिला मतदारांचा समावेश आहे.

तालुकानिहाय अंतिम मतदान टक्केवारी

  • बुलडाणा ः 72.13 टक्के
  • चिखली ः 76.84 टक्के
  • देऊळगाव राजा ः 77.23 टक्के
  • सिंदखेड राजा ः 77.59 टक्के
  • मेहकर ः 80.95 टक्के
  • लोणार ः 78.09 टक्के
  • खामगाव ः 79.65 टक्के
  • शेगाव ः 81.94 टक्के
  • जळगाव जामोद ः 75.34 टक्के
  • संग्रामपूर ः 76.90 टक्के
  • मलकापूर ः 82.48 टक्के
  • नांदुरा ः 80.58 टक्के
  • मोताळा ः 73.66 टक्के
  • एकूण ः 77.36 टक्के