5 महिन्‍यांपूर्वीच लग्‍न झाले होते… पती, सासरच्यांनी मांडला छळ, तिने टोकाचे पाऊल उचलले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलगी (ता. चिखली) येथील 20 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 29 मे रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी विवाहितेच्या पती व सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयुरी शिवशंकर रेगुडे (20, रा. मलगी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती शिवशंकर रेगुडे, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मलगी (ता. चिखली) येथील 20 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना 29 मे रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी विवाहितेच्‍या पती व सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मयुरी शिवशंकर रेगुडे (20, रा. मलगी) असे आत्‍महत्‍या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती शिवशंकर रेगुडे, सासरा प्रल्हाद रेगुडे यांना अटक करण्यात आली आहे. मयुरीचे लग्‍न 5 महिन्यांपूर्वी झाले होते. तिच्या आईने पिंपळगाव रेणुकाई (ता. भोकरदन) येथून येत मयुरीच्‍या पती व सासऱ्याविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून काल, 30 रोजी पोलिसांनी मयुरीला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपास चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे, मदतनीस गोरखनाथ राठोड, बिट जमादार रामेश्वर आंधळे, मदतनीस प्रशांत जायभाये करीत आहेत.