5 मार्चला होणार होते लग्‍न; त्यापूर्वीच युवकाचा गळफास; काय असेल चिठ्ठीत लिहिलेले कारण… देऊळगाव राजा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५ मार्च रोजी त्याचे लग्न होणार होते. मात्र लग्नापूर्वीच त्या 25 वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर शिवारात काल, 19 फेब्रुवारीला पहाटे उघडकीस आली. राहुल विष्णू खांडेभराड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, आत्महत्येचे कारण राहुलने एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते. ही …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५ मार्च रोजी त्याचे लग्‍न होणार होते. मात्र लग्नापूर्वीच त्‍या 25 वर्षीय युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर शिवारात काल, 19 फेब्रुवारीला पहाटे उघडकीस आली. राहुल विष्णू खांडेभराड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, आत्महत्येचे कारण राहुलने एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते. ही चिठ्ठी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
राहुल त्याच्या परिवारासहित पिंपळनेर शिवारात असलेल्या त्यांच्या शेतात वास्तव्याला होता. दरम्यान काल पहाटे त्‍याने शेतातील घराजवळ असलेल्या झाडाला गळफास घेतला असल्याचे आढळले. खांडेभराड परिवारात लग्नाची जोरदार तयारी सुरु असताना राहुलने हे पाऊल का उचलले, याचे कोडे त्‍या चिठ्ठीत दडलेले आहेत. तूर्त पोलिसांनी तपासाच्‍या कारणास्‍तव त्‍या चिठ्ठीतील मजकूर सांगितला नसला तरी चिठ्ठीवरून मात्र तर्कवितर्क लढवले जात आहेत. काय असेल ते कारण, अशी चर्चा गावात सुरू आहे.