51 सरपंचांची उद्यापासून 3 टप्प्यांत होणार निवड, दुपारी 2 वाजता सभा, 12 वाजेपर्यंत भरता येईल अर्ज

बुलडाणा (संजय मोहिते ः विशेष प्रतिनिधी) ः बुलडाणा तालुक्यातील 51 सरपंचाचा फैसला 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान 3 टप्प्यांत होणार आहे.घोषित कार्यक्रमानुसार उद्या 9 फेब्रुवारीला दहिद खुर्द व बुद्रुक, देऊळघाट, सोयगाव, डोंगर खंडाळा, मासरूळ, मातला, नांद्रा कोळी, रुईखेड टेकाळे, साखळी बुद्रुक, शिरपूर, बिरसिंगपूर, कोलवड, सागवान व तांदुळवाडी येथील सरपंच निवडणूक होणार आहे. 10 फेब्रुवारीला अजीसपूर, …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः विशेष प्रतिनिधी) ः बुलडाणा तालुक्यातील 51 सरपंचाचा फैसला 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान 3 टप्प्यांत होणार आहे.
घोषित कार्यक्रमानुसार उद्या 9 फेब्रुवारीला दहिद खुर्द व बुद्रुक, देऊळघाट, सोयगाव, डोंगर खंडाळा, मासरूळ, मातला, नांद्रा कोळी, रुईखेड टेकाळे, साखळी बुद्रुक, शिरपूर, बिरसिंगपूर, कोलवड, सागवान व तांदुळवाडी येथील सरपंच निवडणूक होणार आहे. 10 फेब्रुवारीला अजीसपूर, भडगाव, देवपूर, गुम्मी, चांडोळ, जांब, हातोडी बुद्रुक, म्हसला बुद्रुक, पाडळी, पलसखेड भट व नागो, पांगरी, रायपूर, सातगाव म्हसला येथील कारभारी निवडले जातील. यापाठोपाठ 11 तारखेला डोमरुळ, तराडखेड, वरुड, अंभोडा, भादोला, धाड, धामणगाव, जामठी, जनुना, सावळी, कुलमखेड, दुधा, मालवंडी, मालविहिर, मढ, केसापूर, बोरखेड, सिंदखेड येथील निवडणुका पार पडतील. दरम्यान तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात या निवडणुकांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच सभेचे अध्यासी अधिकारी नेमण्यात आले आहेत. यामध्ये नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, पंचायत समित्यांचे विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता आदींचा समावेश आहे.
असा आहे कार्यक्रम
दुपारी 2 वाजता संबंधित ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा, त्यापूर्वी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारणार. दुपारी 2ः10 वाजेपर्यंत अर्ज छाननी, दुपारी 2ः20 वाजेपर्यंत माघार घेता येईल. दुपारी अडीच वाजता आवश्यक असेल तर हात उंचावून मतदान घेण्यात आल्यावर सरपंच व उपसरपंच निवड जाहीर करण्यात येणार आहे.