54 वर्षीय व्‍यक्‍तीने वायरने घेतला गळफास!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 54 वर्षीय व्यक्तीने निंबाच्या झाडाला वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, 26 एप्रिलला सकाळी 11 च्या सुमारास खामगाव शहरातील दाळफैल भागात घडली. श्रावण रामचंद्र ताठे (रा. दाळफैल, खामगाव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. ते काल सकाळी 11 च्या सुमारास जेवण करून घराबाहेर …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 54 वर्षीय व्‍यक्‍तीने निंबाच्‍या झाडाला वायरने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना काल, 26 एप्रिलला सकाळी 11 च्‍या सुमारास खामगाव शहरातील दाळफैल भागात घडली.

श्रावण रामचंद्र ताठे (रा. दाळफैल, खामगाव) असे आत्‍महत्‍या केलेल्या व्‍यक्‍तीचे नाव आहे.  त्‍यांची मानसिक स्‍थिती बरोबर नव्‍हती. ते काल सकाळी 11 च्‍या सुमारास जेवण करून घराबाहेर पडले. बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने त्‍यांची पत्‍नी सौ. द्वारकाबाई यांनी त्‍यांचा शोध सुरू केला. तेव्‍हा टिळक राष्ट्रीय विद्यालयाच्‍या आवारातील निंबाच्‍या झाडाला श्रावण यांनी वायरने गळफास घेतल्‍याचे दिसून आले. त्‍यांनी आरडाओरड केल्याने तिथून जाणारे नागरिक धावून आले. त्‍यांनी तातडीने ताठे यांना खाली उतरवले. त्यांची छाती दाबली असता श्वास चालू असल्याचे दिसून आले. त्यांना उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोहेकाँ बाजीराव खरात करत आहेत.