55 हजारांच्‍या आयफोनची नांदुऱ्यात चोरी!

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरातील मेन रोडवरील अनिल हार्डवेअरच्या मालकाच्या मुलाचा 55 हजार रुपयांचा आयफोन चोरीला गेला आहे. ही घटना नांदुरा शहरातील डायमंड गॅरेजमध्ये काल, 12 जूनच्या सकाळी घडली. केतन अनिल तांदळे (19) याने त्याचे मित्र रुग्वेद शशीकांत बानाईत व भूषण संतोष टाले यांच्यासह नांदुरा पोलीस ठाण्यात येऊन आयफोन चोरीची तक्रार दिली आहे. …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरातील मेन रोडवरील अनिल हार्डवेअरच्या मालकाच्‍या मुलाचा 55 हजार रुपयांचा आयफोन चोरीला गेला आहे. ही घटना नांदुरा शहरातील डायमंड गॅरेजमध्ये काल, 12 जूनच्‍या सकाळी घडली.

केतन अनिल तांदळे (19) याने त्‍याचे मित्र रुग्वेद शशीकांत बानाईत व भूषण संतोष टाले यांच्‍यासह नांदुरा पोलीस ठाण्यात येऊन आयफोन चोरीची तक्रार दिली आहे. केतनच्‍या वडिलांच्‍या गाडीचा समोरील लाईट खराब झाल्‍याने बदण्यासाठी तो मोहता हॉस्पिटलजवळील डायमंड गॅरेजमध्ये गाडी घेऊन गेला होता. गाडीत आयफोन ठेवलेला होता.

लाइट आणण्यासाठी केतन सिंग ऑटो पार्ट्‌स दुकानात गेला होता. तिथून परतल्यानंतर गाडीला लाईट बसवून घरी अाला. तेव्हा त्‍याला गाडीत मोबाइल दिसला नाही. त्‍याने पुन्‍हा गॅरेजवर जाऊन चौकशी केली असता कुणीही मोबाइल बघितला नसल्याचे सांगितले. आयफोन 11 प्रो 256 सील्व्हर रंगाचा (किंमत 55 हजार रुपये) चोरट्यांनी गाडीतून चोरल्याची तक्रार त्‍याने दिली आहे. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे.