क्राईम डायरीमुख्य बातम्या

7 क्विंटल गांजाचे कनेक्‍शन कर्नाटक, तेलंगणा!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मलकापूर ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 2 महागड्या चारचाकींसह 7 क्विंटल गांजा असा एकूण 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणात एका जणाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले होते तर तीन जण फरार होण्यात यशस्वी ठरले होते.अवैध गांजाच्या विरोधात केलेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मलकापुर ग्रामीण पोलिसांनी दिली.

जप्त करण्यात आलेला हा गांजा तेलंगणा राज्यातून जळगाव खानदेश परिसरात विक्रीसाठी नेण्यात येत होता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. अटक करण्यात आलेला एक आणि फरार तीन असे चौघेही परराज्यातील आहेत. नवीन रेड्डी वेलंगी रेड्डी (37, जि. मेडसल, तेलंगणा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या चौकशीत फरार झालेल्या तिघांची नावे समोर आली आहेत. मोहम्मद जुबेर (रा. बिदर, कर्नाटक), पिंटू (रा. जाहिराबाद, जि. मेदक, तेलंगणा) आणि गौतम वर्मा (रा. शहापूरनगर जि. हैदराबाद) अशी फरार झालेल्यांची नावे असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दोन वाहनांमधून चौघे जण हे जळगाव खानदेश येथे जात होते. तिथे ते कोणाकडे जात होते. गांजा कुणाला विकणार होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा उपलब्ध कुठून झाला, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस तपासात यामध्ये आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: