बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

7 तालुक्यांतील कोरोना प्रकोप कायम! बळींचे द्विशतक पूर्ण!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कमी अधिक वर्षभरात कोरोना बळींची संख्या 200 वर पोहोचली! आज, 7 मार्चला पॉझिटिव्ह रुग्‍णांची संख्या 379 इतकी असून, या टप्प्यावर जिल्ह्यात संमिश्र चित्र आहे. जिल्हावासीयांना पूर्ण दिलासा द्यायचा नाहीच अशा हटवादी भूमिकेत कोरोना ऊर्फ कोविड हा खलनायक असल्याचे दिसून येते.

कोरोना बळींची संख्या आज 200 वर पोहोचली. 7 तालुक्यांतील कोरोनाचा प्रकोप कायम आहे. खामगाव तालुक्‍यात 64, बुलडाणा 47, देऊळगावराजा 44, शेगाव 31, मलकापूर 53, नांदुरा 37 व मोताळा 32 हे ते तालुके होत. गत पंधरवड्यापासून उद्रेक कायम असलेल्या चिखलीचा आकडा 26 पर्यंत येणे मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र हा दिलासा किती तास राहील? हा सवाल आहे. मेहकर तालुक्‍यात 4 लोणार 3,जळगाव 6 सिंदखेड राजा 18, संग्रामपूर 0 या तालुक्यांतील आकडे दिलासा देणारे ठरावेत.

रेट जास्तच…
दरम्यान गत 24 तासांतील चित्र असे संमिश्र असले तरी पॉझिटिव्हीटी रेट 19.17 टक्के इतका आहे. आजवरचा दर 11.70 इतका आहे. प्राप्त अहवाल 2 हजारांपेक्षा कमी म्हणजे 1977 असतानाही 379 जण बाधित येणे धोक्याची घंटा मानली जात आहे. नमुने संकलनाचा आकडा देखील तुलनेने कमी आहे. 24 तासांत 1856 नमुनेच घेण्यात आले .यातही आरटीपीसीआर 921 तर रॅपिड 798 असे बोलके आकडॆ आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: