गोड बातमी… जिल्ह्यातील अवकाळी, गारपीटग्रस्‍त शेतकऱ्यांना 13 कोटी 18 लाख रुपयांची मदत मिळणार!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे 2020 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 13 कोटी 88 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी आयुक्तांकडून शासनाकडे पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे यात 10 हजार 363 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी 13 कोटी 88 लाख 38 हजार …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे 2020 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 13 कोटी 88 लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी आयुक्‍तांकडून शासनाकडे पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे यात 10 हजार 363 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्‍यासाठी 13 कोटी 88 लाख 38 हजार रुपयांची मदत निधी देण्यात आला आहे. हा निधी विभागीय आयुक्‍तांमार्फत वितरित होणार आहे. शेती अथवा बहुवार्षिक फळपिकांच्‍या नुकसानीसाठी मदत 33 टक्‍के अथवा त्‍याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकांच्‍या संयुक्‍त स्‍वाक्षरीने झालेल्या पंचनाम्‍यांनुसार मदत वाटप करण्यात येईल. मदत थेट शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात वाटप होईल.