जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Beaking! 1 महिन्यापासून जीव टांगणीला लागलेल्या 22 सरपंचाची प्रतीक्षा संपली!! उद्या नव्याने ठरणार आरक्षण

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सुमारे 1 महिन्यापासून जीव टांगणीला लागलेल्या 29 पैकी 22 ग्रामपंचायतींमधील इच्छुक सदस्यांची ‘इंतजार की घडी’ आता संपली आहे. या ठिकाणचे सरपंच पदाचे आरक्षण नव्याने काढण्यात येणार असून, त्यासाठी उद्या 4 मार्चचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. यामुळे उद्याची विस्तारित सोडत लक्षवेधी ठरणार आहे.

जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्यानंतर 18 जानेवारीला निकाल लागून सदस्य ठरले. यानंतर 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान कमीअधिक 493 ग्रामपंचायतींचे सरपंच- उपसरपंच निवडण्यात आले. त्यांनी थाटात कारभार स्वीकारून कामकाज देखील सुरू केले. दुसरीकडे 33 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा फैसला अगोदर काढलेल्या आरक्षणामुळे होऊ शकला नाही. निघालेल्या आरक्षणाचे सदस्यच नसल्याने हा गुंता निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर आज 4 सरपंच निवडण्यात आले. आता उर्वरित 29 पैकी 22 ठिकाणची आरक्षण सोडत उद्या 4 मार्चला काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारी 12 वाजता हे आरक्षण ठरणार आहे. यामध्ये जवळा बाजार, माळेगाव गौड, अलमपूर (ता. नांदुरा), पुन्हई, कोथळी,अंतरी, टाकळी वाघजल (ता. मोताळा), वरवट खंडेराव, पातुर्डा खुर्द, रुधाना, तामगाव, आलेवाडी (ता. संग्रामपूर), अरेगाव (ता. मेहकर), वरखेड (ता. मलकापूर), भोगावती, दिवठाणा (ता. चिखली), आडोल बुद्रुक, वडशिंगी (ता. जळगाव जामोद), अजीसपूर (ता. बुलडाणा), पिंपरखेड (ता. सिंदखेड राजा), गोत्रा (ता. लोणार), गवंडाळा (ता. खामगाव) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

‘ ओपन’ ला संधी नाय!
दरम्यान, यावेळी आरक्षण लागू असणाऱ्या संवर्गाचीच सोडत काढण्यात येणार आहे. तशी कायद्यातच तरतूद आहे. सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण यापूर्वी च काढण्यात आले आहे. यामुळे उद्याच्या सोडतीत ओपन वाल्यांना संधी नाय!

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: