Big Breaking : व्यावसायिकांना दिलासा पण संचारबंदीमध्ये वाढ! सर्व दुकानांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ची वेळ, हॉटेल मालकांवर कृपा! 12 तासांची संचारबंदी!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी): जिल्ह्यात 1 मार्चच्या सकाळी 8 वाजेपर्यंत लागू संचारबंदीमध्ये 8 मार्चपर्यंत वाढ करून नागरिकांची डोकेदुखी वाढवितानाच जिल्हा प्रशासनाने सर्व स्तरातील लहान, मध्यम मोठ्या व्यापाऱ्यांना दिलासाही दिला आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने आता सकाळी 9 ते संध्याकाळी वाजेदरम्यान सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. कँटीन, हॉटेल्सवर कृपा दाखवितानाच दूध विक्रेते, डेअरी यांना 2 …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी): जिल्ह्यात 1 मार्चच्या सकाळी 8 वाजेपर्यंत लागू संचारबंदीमध्ये 8 मार्चपर्यंत वाढ करून नागरिकांची डोकेदुखी वाढवितानाच जिल्हा प्रशासनाने सर्व स्तरातील लहान, मध्यम मोठ्या व्यापाऱ्यांना दिलासाही दिला आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने आता सकाळी 9 ते संध्याकाळी वाजेदरम्यान सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. कँटीन, हॉटेल्सवर कृपा दाखवितानाच दूध विक्रेते, डेअरी यांना 2 टप्प्यांत विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.
21 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदी व लॉकडाऊनची मुदत उद्या, 1 मार्च रोजी सकाळी 8 वाजता संपत आहे. यामुळे आता काय, पुढील आदेश काय निघतो, मुदतवाढ होते काय, इतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार काय, असे अनेक प्रश्न ऐरणीवर आले होते. आज या उत्सुकतेने कळस गाठला! सोशल मीडियावर नको त्‍या अफवा पसरत होत्‍या. मात्र बुलडाणा लाइव्‍हने नेहमीप्रमाणे कन्‍फर्म न्‍यूज देण्याची भूमिका ठेवत संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या सर्व प्रश्नांची साधक बाधक उत्तरे आपल्या या बातमीद्वारे दिली आहेत.
असे आहेत निर्देश…

  • संध्याकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी.
  • सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
  • हॉटेल्सला संध्याकाळ 5 ते रात्री 9 पर्यंत पार्सल सेवेची संधी.
  • आठवडी बाजार बंदच.
  • हायवेवरील हॉटेल्‍स, धाबे, रेस्टॉरंट ला पूर्ण मुभा.
  • आरोग्य सेवा 24 तास सुरू.
  • डेअरी सकाळी 6 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9
  • मॉर्निंग वाक व व्यायामस परवानगी.