Big Breaking! किराणा, भाजीपाल्याची दुकाने आज 4 वाजेपर्यंत राहणार उघडी!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना पॉझिटिव्ह व बळींची संख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आज, 10 मेच्या रात्री 8 पासून कडकडीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून आज दुपारी 4 वाजेपर्यंत किराणा व भाजीपाल्याची दुकाने उघडी ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामुळे लाखो नागरिकांची मोठी गैरसोय …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना पॉझिटिव्ह व बळींची संख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आज, 10 मेच्‍या रात्री 8 पासून कडकडीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून आज दुपारी 4 वाजेपर्यंत किराणा व भाजीपाल्याची दुकाने उघडी ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामुळे लाखो नागरिकांची मोठी गैरसोय टळली आहे.

कडक लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद राहणार आहेत. यामुळे आज सकाळी 7 वाजेपासूनच बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील लाखो नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये तोबा गर्दी झाली. पेट्रोलपंपावर वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्या. भाजीपाला, किराणा खरेदीसाठी गैरसोय होऊ नये म्‍हणून आजच्‍या दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत भाजीपाला व किराणा दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले.

अव्वाच्‍या सव्वा दराने भाजीपाला

दहा दिवसांचा भाजीपाला खरेदी करून ठेवावा लागणार असल्याने नागरिक बाजारात गेले तसे त्‍यांना धक्‍काच बसला. 10 रुपये पाव मिळणाऱ्या भाज्या तब्‍बल 25 ते 30 रुपये पावच्‍या दराने विकल्या गेल्या. याबद्दल विचारणा करणाऱ्या नागरिकांना वरून आदेश आहे… असे उपहारात्‍मक उत्तर विक्रेत्‍यांनी दिल्याने ग्राहकांनाही डोक्‍याला हात मारून घेतला.