Big Breaking !जिल्हावासियांनो आता सोमवारी सकाळी 7 नंतरच पडा घराबाहेर! शहरी भागात आज दुपारी 3, ग्रामीणमध्ये संध्याकाळी 5 पासून कडक संचारबंदी!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मर्यादित संचारबंदी, लॉकडाऊन लावूनही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येण्याऐवजी वाढतच असल्याने जिल्ह्यातील 13 कंटेन्मेंट झोनमध्ये आज, 26 फेब्रुवारीच्या दुपारी 3 तर ग्रामीण भागात संध्याकाळी 5 वाजेपासून कडक संचारबंदी लागू राहणार आहे. यातून आरोग्य सुविधांना पूर्ण तर दूध विक्रेते, डेअरी व्यवसायाला मर्यादित सूट देण्यात आली आहे.कोरोनाचा उद्रेक लक्षात …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मर्यादित संचारबंदी, लॉकडाऊन लावूनही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येण्याऐवजी वाढतच असल्याने जिल्ह्यातील 13 कंटेन्मेंट झोनमध्ये आज, 26 फेब्रुवारीच्‍या दुपारी 3 तर ग्रामीण भागात संध्याकाळी 5 वाजेपासून कडक संचारबंदी लागू राहणार आहे. यातून आरोग्य सुविधांना पूर्ण तर दूध विक्रेते, डेअरी व्यवसायाला मर्यादित सूट देण्यात आली आहे.
कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता जिल्ह्यातील 13 नागरी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यात बुलडाणा, चिखली, मेहकर, मलकापूर, मोताळा, संग्रामपूर, जळगाव, खामगाव, शेगाव, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, नांदुरा या नागरी भागांचा समावेश आहे. मात्र कोरोना आटोक्यात येत नसल्याने प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या, नागरी क्षेत्रात शुक्रवारी दुपारी 3 पासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सुधारित आदेशाद्वारे काढण्यात आला. ग्रामीण भागात आज संध्याकाळी 5 वाजेपासून ही संचारबंदी लागू राहणार आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी आज दुपारी नव्याने जारी केले. यातून मेडिकल स्टोअर, दवाखाने यांना सूट देण्यात आली आहे. तसेच डेअरी, दूध विक्रेता यांच्यासाठी सकाळी 6 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 6 ते 8ः30 अशी वेळ ( पूर्ववत) राहणार आहे.