Big Breaking… जीवनावश्यक सेवा, वस्‍तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने जिल्ह्यातही राहणार बंद!; 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध! दिवसा जमावबंदी, रात्री कर्फ्यू, शुक्रवार ते सोमवार 59 तासांचा कडक लॉकडाऊन

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः राज्य शासनाच्या धर्तीवर जिल्ह्यातही 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यादरम्यान जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने (तीही मर्यादित वेळात) सुरू राहणार आहेत. दिवसा जमावबंदी तर रात्री 8 ते सकाळी 7 वाजेदरम्यान कडक कर्फ्यू लागू राहणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजे दरम्यान 59 तासांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः राज्य शासनाच्या धर्तीवर जिल्ह्यातही 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यादरम्यान जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने (तीही मर्यादित वेळात) सुरू राहणार आहेत. दिवसा जमावबंदी तर रात्री 8 ते सकाळी 7 वाजेदरम्यान कडक कर्फ्यू लागू राहणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजे दरम्यान 59 तासांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

राज्य शासनाने 4 एप्रिलला ब्रेकिंग द चेन अंतर्गत 12 पानी सविस्तर नियमावली व निर्देश जारी केले होते. जिल्हा प्रशासनाने त्यावर आज दिवसभर चिंतन मनन करून संध्याकाळी 7:30 वाजता जिल्ह्यासाठीचे नियम, निर्देश जारी केले आहेत.

  • सकाळी 7 ते रात्री 8 दरम्यान जमावबंदी, 5 पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई
  • रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान संचारबंदी ,अत्यावश्यक कारणाशिवाय फिरण्यास बंदी
  • किराणा, डेअरी, भाजीपाला, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवेतील दुकानेच राहणार सुरू
  • क्लब, उद्यान, मनोरंजन केंद्र, क्रीडा संकुल, राहणार बंद
  • जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद
  • कटिंग, सलून, ब्युटी पार्लर बंद
  • लग्न समारंभास  वधू वर, बँड पथकासह 50 जणांनाच परवानगी
  • अंत्यविधीस 20 व्यक्तींनाच मुभा
  • धार्मिक स्थळे बंद
  • एसटी बस पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मुभा, मात्र उभे प्रवासी नकोत
  • हॉटेल्स, बारवरही निर्बंध, मर्यादित पार्सल सेवा
  • व्यावसायिक व त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण , आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक.

8 च्‍या ठोक्‍याला ठोकाठोकी!

मुख्यमंत्र्यांच्‍या निर्देशानुसार, रात्री ८ नंतर कडक निर्बंध राहणार आहेत. त्‍याचे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन रात्री 8 च्‍या ठोक्‍याबरोबर रस्‍त्‍यावर उतरले. स्‍वतः ठाणेदारही रस्‍त्‍यावर दिसले. रस्‍त्‍यावरील फिरणारी वाहने अडवून काहींना समज तर काहींना नीट उत्तर न देता आल्याने दंडूक्‍याचा प्रसादही मिळाला. या कारवाईमुळे काही काळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली.