Big Breaking : प्रशासनाने काही तासांतच तलवार केली म्यान! 62 तासांचा कर्फ्यूचा निर्णय मागे, शनिवार, रविवारीही सुरू राहणार मार्केट

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज शुक्रवारी दुपारी काढलेला 62 तासांच्या कर्फ्यूचा आदेश जिल्हा प्रशासनाने जेमतेम 2 तासांतच फिरवल्याने प्रशासकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. पहा व्हिडिओ… वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास आदेश निर्गमित केले. आज शुक्रवारी संध्याकाळी 6 ते सोमवारी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आज शुक्रवारी दुपारी काढलेला 62 तासांच्या कर्फ्यूचा आदेश जिल्हा प्रशासनाने जेमतेम 2 तासांतच फिरवल्याने प्रशासकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेत उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.

पहा व्हिडिओ…

वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज दुपारी दीड वाजताच्‍या सुमारास आदेश निर्गमित केले. आज शुक्रवारी संध्याकाळी 6 ते सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार व अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद राहतील, असे आदेशात नमूद होते, मात्र या आदेशाची ब्रेकिंग न्यूज होईपर्यंत व ग्रुपवर आदान प्रदान होईस्तोवर हा आदेश रद्द करण्यात आला. आरडीसी दिनेश गीते यांनी मोजक्या माध्यम प्रतिनिधींसमवेत बोलताना हा 62 तासांचा कर्फ्यू रद्द झाल्याचे स्पष्ट केले. तसेच लॉकडाउनमुळे कोरोना नियंत्रणात येत नसल्याने व व्यापारी, मजुरांची होणारी अडचण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. यामुळे शनिवारी व रविवारी देखील सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान सर्वच दुकाने सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले.