Big Breaking : सायंकाळी 6 पासून सोमवारी सकाळी 8 पर्यंत जिल्ह्यात कडक संचारबंदी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालल्याने, त्याला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज, 12 मार्चच्या सायंकाळी 6 पासून 15 मार्चच्या सकाळी 8 पर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या काळात दूध विक्रेते व वितरण केंद्रांना सकाळी 6 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 6 ते सायंकाळी 9 या काळात परवानगी देण्यात …
 

बुलडाणा  (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोना रुग्‍णसंख्या वाढतच चालल्याने, त्‍याला आटोक्यात आणण्यासाठी जिल्‍हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज, 12 मार्चच्‍या सायंकाळी 6 पासून 15 मार्चच्‍या सकाळी 8 पर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे.

संचारबंदीच्‍या काळात दूध विक्रेते व वितरण केंद्रांना सकाळी 6 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 6 ते सायंकाळी 9 या काळात परवानगी देण्यात आली आहे. औषधी सेवा, दवाखाने, रुग्‍णवाहिका 24 तास सुरू राहणार असून, एसटी वाहतुकीला 50 टक्‍के प्रवासी क्षमतेसह 24 तास परवानगी आहे. मालवाहतूक या काळात एमआयडीसी भागासह सुरू असेल. पेट्रोलपंप, टाय पंक्‍चरची दुकानेही सुरू असतील. पूर्वनियोजित परीक्षाही होणार असून, बँकाही त्‍यांच्‍या नियमित वेळेनुसार सुरू असतील. याशिवाय अन्य सर्व दुकाने बंद असतील. नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली असून, अशा नागरिकांविरुद्ध कडक कारवाई केली जाऊ शकते, असे आदेशात म्‍हटले आहे.