Breaking! आणखी एका रेशन दुकानदार निघाला पॉझिटिव्ह!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने करण्यात येणाऱ्या तपासणी मोहिमेत तालुक्यातील आणखी रेशन दुकानदार पॉझिटिव्ह निघाला. यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांचे कुटुंब व शेकडो ग्राहक संभाव्य संसर्गातून बचावले असे म्हणता येईल. बुलडाणा शहर, तालुक्यासह तहसीलमधील कोविड स्फोट लक्षात घेता तहसीलदार रुपेश खंडारे यांनी कोविडच्या प्रसारास कारणीभूत ठरू शकणाऱ्या तालुक्यातील रेशन दुकानदारांची …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने  करण्यात येणाऱ्या तपासणी मोहिमेत तालुक्यातील आणखी रेशन दुकानदार पॉझिटिव्ह निघाला. यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांचे कुटुंब व शेकडो ग्राहक संभाव्य संसर्गातून बचावले असे म्हणता येईल.

बुलडाणा शहर, तालुक्यासह तहसीलमधील कोविड स्फोट लक्षात घेता तहसीलदार रुपेश खंडारे यांनी कोविडच्या प्रसारास कारणीभूत ठरू शकणाऱ्या तालुक्यातील रेशन दुकानदारांची कोरोनाविषयक तपासणी करवून घेतली. 15 मार्चच्या मुहूर्तावर तहसील कार्यालयातच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी एकूण 116 पैकी 60 जणांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. यापैकी एका दुकानदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आज, 16 मार्चला उर्वरित 56 जणांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. त्यातील एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तपासणीत 2 रेशन दुकानदार कोरोनाबाधित निघाले आहेत.