Breaking ! बुलडाणा तहसीलमधील आणखी एक कर्मचारी पॉझिटिव्ह !! पॉझिटिव्हचा आकडा 21 वर; अवघ्या 9 कर्मचाऱ्यांवर ऑफिसची मदार

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तहसीलमध्ये 4 ते 7 मार्च दरम्यान कोरोनाचा स्फोट झाला असून, 11 दिवसांनंतरदेखील याचे पडसाद उमटत आहेत. आज, 15 मार्चला आणखी 1 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने हा आकडा तब्बल 21 वर पोहोचलाय! यामुळे दहा दिवसापासून तहसीलचे कामकाज विस्कळीत झाले आहे. यापूर्वी मार्चचा पहिला आठवडा तहसीलचे कामकाज ठप्प …
 

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तहसीलमध्ये 4 ते 7 मार्च दरम्यान कोरोनाचा स्फोट झाला असून, 11 दिवसांनंतरदेखील याचे पडसाद उमटत आहेत. आज, 15 मार्चला आणखी 1 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने हा आकडा तब्बल 21 वर पोहोचलाय! यामुळे दहा दिवसापासून तहसीलचे कामकाज विस्कळीत झाले आहे.

यापूर्वी मार्चचा पहिला आठवडा तहसीलचे कामकाज ठप्प करणारा व तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यासह कर्मचाऱ्यांची कठोर परीक्षा घेणारा ठरला. 4 मार्चला तहसीलमधील 3 जण पॉझिटिव्ह आले. यानंतर 7 मार्चला तब्बल 15 कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्याचे आढळले. या पाठोपाठ 8 मार्चला आणखी 1 जण बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामुळे उडालेली खळबळ शमत नाही तोच आज 15 मार्चला पुन्हा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आलाय! यामुळे केवळ 11 दिवसांच्या कालावधीत तब्बल 21 कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने तहसील कार्यालय हादरलेलेच आहे.

तणावपूर्ण शांतता
दरम्यान 21 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने तहसीलचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. पब्लिकची जास्त वर्दळ असलेल्या अन्न पुरवठा कक्षाचे काम ठप्प झाले आहे. अशीच गत इतर विभागांची आहे. तहसीलदार रुपेश खंडारे मोजक्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामकाज करीत आहेत. तहसीलचे कामकाज 9 कर्मचारी सांभाळत आहेत. दिवसभर हाऊसफुल्ल राहणाऱ्या तहसील परिसरात शुकशुकाट व तणावपूर्ण शांतता पसरल्याचे जाणवते. अजूनही कार्यालयात यायला पब्लिक कचरत असल्याचे आज दिसून आले.