बुलडाणा तहसीलमध्ये पुन्‍हा कोरोना स्फोट!! आणखी 15 कर्मचारी पॉझिटिव्ह

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज, 8 मार्चला सकाळी सकाळीच कडू बातमी घेऊन बुलडाणा लाइव्ह तुमच्यासमोर येतेय. गेल्या आठवड्यात तीन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळलेल्या बुलडाणा तहसील कार्यालयात कोरोनाने चक्क स्फोटच घडवला आहे. तहसीलमधील तब्बल 15 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे बुलडाणा तहसील, महसूल विभागासह प्रशासकीय वर्तुळ अक्षरशः हादरले आहे! यामुळे तूर्तास …
 

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आज, 8 मार्चला सकाळी सकाळीच कडू बातमी घेऊन बुलडाणा लाइव्‍ह तुमच्‍यासमोर येतेय. गेल्‍या आठवड्यात तीन कर्मचारी पॉझिटिव्‍ह आढळलेल्या बुलडाणा तहसील कार्यालयात कोरोनाने चक्‍क स्फोटच घडवला आहे. तहसीलमधील तब्बल 15 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे बुलडाणा तहसील, महसूल विभागासह प्रशासकीय वर्तुळ अक्षरशः हादरले आहे! यामुळे तूर्तास कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे.

यापूर्वी ४ मार्च रोजी कोरोनाने बुलडाणा तहसीलमध्ये पुन्हा एन्ट्री केली. गत्‌वर्षी कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांना लागण झाली होती. 4 मार्च 2021 च्या अशुभ मुहूर्तावर तहसीलमध्ये कमबॅक करणाऱ्या कोविडमुळे  तिघे कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे तर दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. यामुळे तहसील कार्यालय तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. यानंतर  55 कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे तहसीलमधेच स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यांचे अहवाल 3 दिवसांनी मिळणार, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले, हे अहवाल काहीसे उशिराने  मिळाले. आजची सकाळ कोरोना विरोधात निकराने लढणाऱ्या तहसीलसाठी अशुभ ठरली. तपासणी करण्यात आलेल्यांपैकी तब्बल 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत.