बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

‘Buldana Live’ ला आला तातडीचा फोन… बुलडाणा बसस्थानकावरील ‘हा’ धक्कादायक प्रकार पाहण्यासाठी लगेच या…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वर्षभरातच प्रत्‍येक बुलडाणेकराच्‍या मनात विश्वासाचे स्‍थान मिळवलेल्या ‘बुलडाणा लाइव्ह’चा फोन सतत खणखणत असतो. समस्या, अडचणी निर्भिडपणे मांडण्याचं आणि न्याय मिळवून देण्याचं काम ‘बुलडाणा लाइव्ह’च करेल, असा विश्वास सर्वसामान्य जिल्हावासियांना वाटतो. अर्थात नागरिक, वाचकांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्‍नही ‘बुलडाणा लाइव्ह’ची टीम करत आहेच. फोनवर नागरिक समस्या सांगतात, घडलेल्या घटनांची माहिती देतात… आलेल्या माहितीची शहनिशा आणि सत्यता तपासून ‘बुलडाणा लाइव्ह’ वृत्त प्रसिद्ध करते. अगदी धुऱ्याच्या वादापासून तर कुटूंबातील सदस्य हरविल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काही मजेशीर फोनही आलेत… त्‍यात आज, 1 जुलैला आलेल्या फोनने कळसच केला… त्याचाच हा किस्सा…

सायंकाळी पाच वाचून 21 मिनिटांनी ‘बुलडाणा लाइव्ह’ला फोन आला. बुलडाण्याच्‍या बसस्‍थानकावर काही डुकरं एका मृतदेहाचे लचके तोडत आहेत. तुम्ही लवकर या. आम्ही तिथेच आहोत… असे समोरच्‍या व्‍यक्‍तीने त्‍याचे नाव, रहिवास सांगून सांगितले. फोन ठेवताच बुलडाणा लाइव्हची एक टीम तातडीने बुलडाणा बसस्‍थानकावर रवाना झाली. घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र चक्क डोक्याला हात लावायची वेळ आली. एक व्‍यक्‍ती दारू पिऊन घाणीत लोळत होता. आसपास डुकरं होती. दारू जास्त झाल्याने त्याला काही सुचत नव्हते. दुसरा एक व्‍यक्‍ती त्याच्या शेजारी उभा, ज्याने आम्हाला फोन केला. त्यानेही मदिरा प्राशन केलेली. आम्हाला पाहून त्याने हकीकत सांगायला सुरुवात केली… म्हणे हा जो लोळून राह्यला.. त्यो करतो XXX आणि एका कामाचे घेतो 70 रुपये… पैसे जास्त झाले की टुक्की टाकते अन्‌ लोळते. माह्याकडून पण घेतले पैसे…अन्‌ आता लोळून राह्यला… ह्यानच तं कोरोना वाढून राह्यला… तुमी सांगा आता काय करावं… लावा न बातमी, काढा फोटो… वाटलंच त मी बोलतो त्यात… XXX चे पैसे कमी करा, याच्यसाठी मी कलेक्टरलेच भेटतो… आता तुम्हीच सांगा वाचकहो ह्याची अडचण कशी सोडवायची आणि कुणाकडे सोडवायची..?

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: