Buldana Live Effect…तर मर्यादित स्वरुपात सुरू होणार पॉलि क्लिनिक, खासगी रुग्णालयाशी संलग्न असल्याने ‘त्या’ सेवा उपलब्ध!

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय परिसरातील इसीएचएस रुग्णालयातील 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तूर्तास सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र निगेटिव्ह अहवाल असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मर्यादित स्वरूपात का होईना रुग्णालयातील आरोग्य सेवा लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. रुग्णालयाशी संबंधित वरिष्ठ सूत्रांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. एकाच …
 

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय परिसरातील इसीएचएस रुग्णालयातील 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तूर्तास सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र  निगेटिव्ह अहवाल असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मर्यादित स्वरूपात का होईना रुग्णालयातील आरोग्य सेवा लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.

रुग्णालयाशी संबंधित वरिष्ठ सूत्रांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. एकाच वेळी 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने व रुग्णालयात मोजकेच कर्मचारी असल्याने सेवा ठप्प झाली. तसेच हा संसर्ग वाढू नये व एखादा कॅरिअर असल्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयातील सेवा 14 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र परिस्थिती सुरळीत झाली तर निगेटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोग्य सेवा मर्यादित स्वरूपात का होईना सुरू ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे या सूत्रांनी सांगितले. हे रुग्णालय एका सुसज्ज खाजगी रुग्णालयाशी (लद्धड हॉस्पिटलसोबत) उपचारासाठी संलग्न करण्यात आले आहे. यामुळे गंभीर रुग्णाच्या उपचारासाठी व्यवस्था आहे. तसेच इतरत्र महागडा इलाज घेतला तर त्याचे बिल देण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे, असे या सूत्रांनी सांगितले.