जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Buldana Live Exclusive…तर सरपंच निवडीसाठी गुप्त मतदान, एरवी हात उंचावून ठरते मतदान!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे 12 लाखांवर जनतेचे लक्ष वेधून घेणार्‍या 527 सरपंच निवडणुकीसाठी तीन टप्प्यांतील अर्थात 9 ते 11 फेब्रुवारीचा मुहूर्त मुक्ररर करण्यात आला आहे. या निवडणुकीइतकीच निवड प्रक्रिया कशी राहील, याची देखील हजारो सदस्य व त्यांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीशी संलग्न अधिकार्‍यांसोबत बुलडाणा लाईव्हने साधलेल्या संवादातून अनेक मजेदार बाबी स्पष्ट झाल्या.
हजारो सदस्यांना सभेची नोटीस सभेच्या 3 दिवसांपूर्वी मिळणे आवश्यक आहे. यावर घरी सदस्य मिळूनच आला नाही तर काय? असा प्रश्‍न उपस्थित होतो. सदस्य महाशय घरी सापडून आलेच नाही तर मग घरातील प्रौढ व्यक्तीस नोटीस देता येते, हे पण अशक्य ठरले तर घराच्या बाहेरील दरवाज्यावर किंवा एखाद्या ठळक जागेत नोटीस लावावी, अशी तरतूद आहे. वेगवेगळ्या तारखांना पार पडणार्‍या सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी दुपारी 2 वाजता आयोजित ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेत उपस्थित सभेत 2/3 नव्हे 1/2 सदस्यांचा कोरम असणे आवश्यक आहे. अर्थात बहुतेक ठिकाणी सदस्य संख्या विषम आहे. यामुळे 7 ची ग्रामपंचायत असली तर किमान 4 सदस्य, 9 ची असली तर 5 सदस्य हजर असणे आवश्यक आहे. सभेच्या अध्यासी अधिकार्‍याने मतदानासाठी एखाद्या अंगठेबहादर सदस्याला मदत केली व त्यावर उपस्थित सदस्यांनी आक्षेप घेतला नाही तर निकालानंतर आक्षेप घेणे गैर ठरते. यानंतर येतात सर्वात लक्षवेधी व मनोरंजक मुद्दे! सरपंचसाठी झालेल्या मतदानात 2 किंवा जास्त उमेदवारांना सम समान मते मिळाली तर अध्यासी अधिकारी त्यांच्या अधिकारात ईश्‍वर चिठ्ठी काढून अनिर्णित सामन्याचा फैसला करू शकतात. सरपंच पदासाठी इच्छुक सदस्याला अगदी शेवटपर्यंत कसरत करावी लागते. याचे कारण ग्रामपंचायत अधिनियमाच्या संबंधित कलमात समर्थक सदस्यांना अगदी उघडपणे हात वर वरून मतदान नोंदवावे लागते, तसे कायद्यात प्रोविजनच आहे. मात्र सभेस हजर सदस्याने अध्यासीकडे गुप्त मतदानाची मागणी केली तर गुप्त मतदान घ्यावे लागते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: