बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Buldana Live Exclusive : बुलडाणा, खामगाव ठरलेत कोरोना हॉट स्पॉट! 11 दिवसातच पावणेतीन हजार पॉझिटिव्ह!! दररोज पडतेय शतकीय भर, डेंजर झोन मध्ये 4 तालुके

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मागील काही दिवसांत कोरोनाचा उद्रेक वाढला असून, स्फोटक ठरलेले बुलडाणा व खामगाव हे तालुके कोविडचा हॉट स्पॉट ठरल्याचे धक्कादायक व तितकेच धोकादायक चित्र आहे. यापाठोपाठ 4 तालुके डेंजर झोनमध्ये आल्याचे मानले जात आहे.  गत 11 दिवसांत कोरोनाने जिल्हाभरात जोरदार आक्रमण केल्याचे भीषण चित्र आहे.

यंदाचा मार्च एन्डदेखील कोरोनानेच गाजत आहे. 16 ते 26 मार्च दरम्यानच्या जेमतेम 11 दिवसांच्या कालावधीत   केवळ ‘टॉप सिक्स’ तालुक्यांतच  मिळून पॉझिटिव्हने तब्बल पावणेसहा हजारांचा पल्ला गाठलाय! यामध्ये हॉट स्पॉट असलेल्या बुलडाणा (1456 बाधित) व खामगाव (1296 बाधित) या तालुक्यांचा मोठा वाटा आहे. बुलडाणा तालुक्याची सर्वच आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. 22 व 23 मार्च वगळले तर तालुक्यात इतर 9 दिवशी शतकातच  रुग्ण आले. 11 दिवसांची सरासरी 133 इतकी आहे. सर्वात मोठी  रुग्ण संख्या 185 ही  21 मार्चला आली आहे. खामगावमध्ये या काळात 1296 रुग्ण आढळले असून, आजची  153 ही सर्वाधिक  संख्या ठरली. चार दिवस वगळले तर इतर दिनी 106  पेक्षा जास्तच रुग्ण मिळालेत. सरासरी 118 रुग्ण अशी आहे.

2 तालुके हजारांच्या घरात

दरम्यान डेंजर झोनमधील  चिखली (809) व मलकापूर( 874) हे तालुके 11 दिवसांतच हजाराच्या घरात पोहोचले. मलकापूरमध्ये 157 तर चिखलीत 131 ही सर्वाधिक संख्या ठरलीय! देऊळगाव राजामध्ये 663 तर शेगावमध्ये 604 रुग्णांची नोंद झाली आहे. या कालावधीत चिखली 74, मलकापूर 80, देऊळगाव राजा 60, शेगाव 55 रुग्णअशी दैनंदिन सरासरी आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: