Buldana Live Exclusive : कोरोनाच्‍या केवळ साडेनऊ हजार लस शिल्लक!; त्‍याही आज संपणार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्याची सरकारी यंत्रणा सध्या लसीकरणावर भर देत आहे. जिल्हात आतापर्यंत 2 लाख 17 हजार 12 जणांना लस देण्यात आली असून, सध्या केवळ साडेनऊ हजार लस शिल्लक असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली. जिल्ह्यात सध्या कोरोना आजाराने थैमान घातले आहे. कोरोनामुळे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्याची सरकारी यंत्रणा सध्या लसीकरणावर भर देत आहे. जिल्हात आतापर्यंत 2 लाख 17 हजार 12 जणांना लस देण्यात आली असून, सध्या केवळ साडेनऊ हजार लस शिल्लक असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली.

जिल्ह्यात सध्या कोरोना आजाराने थैमान घातले आहे. कोरोनामुळे मृत होणाऱ्यांच्या आकड्यातही आता लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे लसीकरण करणे हा सक्षम पर्याय यंत्रणेपुढे आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्यादृष्टीने सुद्धा प्रशासनाची तयारी सुरू असल्याची माहिती डॉ. सांगळे यांनी दिली. जिल्ह्याकडे आज, 24 एप्रिल रोजी केवळ साडे नऊ हजार लस शिल्लक आहेत. त्याही आज समाप्त होतील. जिल्ह्याने सरकारकडे 1 लाख लसींची मागणी केली आहे, असेही अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले.