Buldana Live Exclusive… कोरोना : 927 बेड उपलब्ध; ऑक्सिजनची मागणीही घटली..!, पॉझिटिव्हिटी रेट चक्‍क 3.63 टक्के खाली!!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात हनुमानाच्या शेपटीसारखी वाढतच चाललेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने घसरत असल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या जिवात जीव येत आहे. प्रशासनाने जिल्ह्यात जाहीर केलेल्या निर्बंधांचाच हा सकारात्मक परिणाम असल्याचे मानले जात आहे. तुडूंब भरलेली रुग्णालये, औषधांचा काळाबाजार, ऑक्सिजनचा तुटवडा त्यात रोज भर घालणारी रुग्णसंख्या …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेच्‍या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात हनुमानाच्‍या शेपटीसारखी वाढतच चाललेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने घसरत असल्याने प्रशासन आणि आरोग्‍य यंत्रणेच्‍या जिवात जीव येत आहे. प्रशासनाने जिल्ह्यात जाहीर केलेल्या निर्बंधांचाच हा सकारात्‍मक परिणाम असल्याचे मानले जात आहे. तुडूंब भरलेली रुग्णालये, औषधांचा काळाबाजार, ऑक्सिजनचा तुटवडा त्यात रोज भर घालणारी रुग्णसंख्या यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र मेच्या सुरुवातीला होते. त्यातच 50 वर्षांखालील रुग्णांची मृत्यूसंख्या मोठी असल्याने भीतीदायक चित्र होते. त्याही परिस्थितीत सरकारी यंत्रणेने जिवाची बाजी लावत कोरोनाला हरवण्याचा चंग बांधला… आज रोजी यश आले नसले तरी यशाच्‍या दिशेने पाऊल पडतेय, असेच म्हणावे लागेल.
पॉझिटिव्हिटी रेट घसरला
जेवढ्या अधिक चाचण्या तेवढे अधिक पॉझिटिव्ह असे सुरुवातीचे चित्र होते. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा 15 टक्‍क्यांपर्यंत पोहचला होता. मात्र कठोर लॉकडाऊनमुळे पॉझिटिव्हिटी रेट झपाट्याने कमी होत आहे. 23 मे रोजी 11.76 टक्के एवढी असणारी टक्केवारी 24 मे रोजी किंचित वाढून 12.55 टक्के झाली. 25 मे रोजी 9.10, 26 मे रोजी 8.26, 27 मे रोजी 8.73, 28 मे रोजी 5.9 आणि आज 29 मे रोजी पॉझिटिव्हिटी रेट चक्‍क 3.63 टक्के एवढा खाली उतरला. याशिवाय रोज बाधित होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तिप्पट आहे.
जिल्ह्यात सगळीकडे बेड उपलब्ध
महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात बेडची कमतरता होती. बुलडाणा येथील शासकीय कोविड रुग्णालयात सुद्धा 30 ते 35 गंभीर रुग्ण बेड रिक्त होण्याची प्रतीक्षा करत होते. मात्र आज एकही रुग्ण प्रतीक्षा करत नसल्याचे बुलडाणा लाइव्हला दिसून आले. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आजघडीला जिल्ह्यात जवळपास सर्वच कोविड हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण 1201 सर्वसाधारण बेड आहेत. पैकी 274 बेड ॲक्टिव्ह तर 927 बेड उपलब्‍ध आहेत.

  • एकूण ऑक्सिजन बेड-789, उपचार सुरू-631 तर सध्या158 उपलब्ध
  • एकूण व्हेंटिलेटर बेड-106, उपचार सुरू 61, सध्या उपलब्ध 158
  • एकूण आयसीयू बेड-499, उपचार सुरू-185, सध्या उपलब्ध-314

ऑक्सिजनची मागणी घटली
कोरोना रुग्णांच्या वाढीव संकटामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी वाढली होती. एप्रिलच्या मध्यापासून ही मागणी दिवसाला 17 ते 18 मेट्रिक टन एवढी होती. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे खासगी अॅम्‍बुलन्सला सुद्धा ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्यासाठी कसरत करावी लागत होती. मात्र आता ऑक्सिजनची मागणी दिवसाला 10 ते 11 मेट्रिक टन एवढी आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लँट कार्यान्वित होत असल्याने जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या वाटेवर आहे.