Buldana Live Exclusive… परवापासून निर्बंध होणार शिथिल; उद्या दुपारपर्यंत आदेश धडकण्याची शक्यता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांची मुदत उद्या, 31 मे रोजी संपत आहे. त्यामुळे पुढे काय, ही उत्सुकता तमाम जिल्हावासियांत आहे. निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसल्यानंतर परवा, 1 जूनपासून निर्बंध शिथिल करण्याची तयारी जिल्हा प्रशासन करत असल्याची माहिती उच्चस्तरीय विश्वसनीय सूत्रांकडून बुलडाणा लाइव्हला मिळाली आहे. गेल्या 15 दिवसांत कोरोना रुग्णांचा आलेख झपाट्याने खाली …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांची मुदत उद्या, 31 मे रोजी संपत आहे. त्‍यामुळे पुढे काय, ही उत्‍सुकता तमाम जिल्हावासियांत आहे. निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसल्यानंतर परवा, 1 जूनपासून निर्बंध शिथिल करण्याची तयारी जिल्हा प्रशासन करत असल्याची माहिती उच्‍चस्‍तरीय विश्वसनीय सूत्रांकडून बुलडाणा लाइव्हला मिळाली आहे.

गेल्या 15 दिवसांत कोरोना रुग्णांचा आलेख झपाट्याने खाली आला. पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा कमी झाला. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले. ऑक्सिजनची मागणी घटली. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध बेडची संख्याही वाढल्याने निर्बंध शिथिल करण्याची हीच ती वेळ या निष्कर्षापर्यंत जिल्हा प्रशासन पोहोचल्याचे समजते. तथापी पूर्णपणे निर्बंध उठवले जाणार नाहीत. ते काही प्रमाणात शिथिल करण्यात येऊन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्‍न करण्यात येणार आहे. सर्व प्रकारची दुकाने एका मर्यादित वेळेत उघडण्याची परवानगी मिळू शकते. मात्र हे करताना दुकानदार व ग्राहकांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करावेच लागेल.

ही वेळ सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत असू शकते. सलून, ब्युटी पार्लर, स्पा, मसाज, शाळा, व्यायामशाळा, शिकवणी वर्ग मात्र पूर्णपणे बंदच राहतील. हॉटेल्स, बार व खाद्यपदार्थांच्‍या दुकानांना होम डिलेव्हरी किंवा पार्सल सुविधेची सूट मिळू शकते. प्रवाशी वाहनांना सुद्धा मर्यादेत प्रवाशी संख्येत प्रवास करण्याची परवानगी मिळू शकते. लग्न, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, सामाजिक कार्यक्रम, अंत्यविधी यांना मात्र सध्या लागू असलेले निर्बंध कायम असतील, अशी माहिती या अधिकारिक सूत्रांनी बुलडाणा लाइव्‍हला दिली.