Buldana Live Exclusive : १ जूनपासून निर्बंध शिथिल होण्याची शक्यता, जिल्हाधिकारी यांची माहिती

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः मागील काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. नजीकच्या काळात यात आणखी घट करण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर 1 जूनपासून कोरोना निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिली. आज, 25 मे रोजी बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना त्यांनी कोरोनाविषयक विविध बाबीवर …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः मागील काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. नजीकच्या काळात यात आणखी घट करण्याचे नियोजन आहे.  या पार्श्वभूमीवर 1 जूनपासून कोरोना निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिली.

आज, 25 मे रोजी बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना त्यांनी कोरोनाविषयक विविध बाबीवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी 1 जूनपासून निर्बंध शिथिल करण्याचे स्पष्ट संकेत दिले. राज्य शासनाच्या निर्देशानुसार यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट आली असून, पॉझिटिव्हीचा दर सुद्धा कमी झाला आहे. नजीकच्या काळात तो आणखी कमी करण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणांनी केले आहे. तसेच सध्या कमीअधिक 6 हजार प्रतिदिन असणारा चाचणी अहवालाची सरासरी 8 हजार पर्यंत नेण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसींगवर देखील भर देण्यात आला आहे.

ऑक्सिजनचा तुटवडा नाही…

दरम्यान सध्या ऑक्सिजनचा तुटवडा नसून, बुलडाणा महिला रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यरत झाला आहे. लवकरच मेहकर, शेगाव, जळगाव, मलकापूर येथील संयंत्र कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत.