बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Buldana Live Good News : जिल्ह्यातील 15 खासगी हॉस्‍पिटल्समध्ये मिळणार कोरोना लस!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हाभरात कोविशिल्ड या कोरोनावरील लसीकरणाची मोहीम सुरू असली तरी आतापर्यंत ही सुविधा केवळ सरकारी रुग्णालयांत होती आणि फ्रंटवर्कर्ससाठीच होती. मात्र जिल्ह्याचा विस्तार आणि मोठी लोकसंख्या पाहता प्रशासनाने जिल्ह्यातील 15 खासगी रुग्णालयांत केवळ 250 रुपयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र यासंदर्भात ज्या हॉस्पिटलची नावे यादीत दिली आहेत त्‍यांच्‍यापर्यंत या लसीकरणाबाबत पुरेशी नियमावली पोहोचलेली नाही. यात बुलडाणा शहरातील 4 खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. शिवाय चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर येथील काही निवडक हॉस्पिटलमध्ये सुद्धा लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. ही सुविधा नेमकी कधी आणि कशी सुरू करण्यात येईल, याबाबतही निश्चितता नाही. बुलडाणा लाइव्ह लवकरच पुढील वृत्तात याबाबतची अधिक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवेल.

ही आहेत ती हॉस्‍पिटल्स….

 • सिटी हॉस्पिटल बुलडाणा
 • अमृत हृदयालय ॲण्ड सुपरस्पेशालिटी बुलडाणा
 • संचेती हृदयालय बुलडाणा
 • मेहेत्रे हॉस्पिटल बुलडाणा
 • मानस हॉस्पिटल
 • कोलते हॉस्पिटल
 • आस्था ॲक्सिडेंट हॉस्पिटल,
 • चोपडे हॉस्पिटल
 • कोठारी हॉस्पिटल चिखली
 • तुळजाई हॉस्पिटल चिखली
 • राठोड हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी
 • मेहकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
 • माउली डायलिसिस सेंटर अँड आयसीयू
 • सोनटक्के चिल्ड्रेन हॉस्पिटल
 • सिल्वरसिटी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड.

सर्वच नंबर चुकीचे
या 15 हॉस्पिटलची लिस्ट आणि त्यांचे संपर्क क्रमांक यादीत आहेत. मात्र या यादीतील सर्वच नंबर हे राँग नंबर असल्याचे बुलडाणा लाइव्‍हच्‍या पडताळणीत समोर आले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: