बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Buldana Live Special : कोरोना लसीकरणासाठी 18 वर्षांवरील व्‍यक्‍तींनी अशी करावी नोंदणी!

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः १८ वर्षांवरील व्यक्तींना Covid-19 लससाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले असून, १ मेपासून लसीकरण सुरू होईल. तुम्‍ही CoWIN पोर्टल किंवा Aarogya Setu ॲपवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. आपल्या राज्यात किती सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्र तयार आहेत त्यानुसारच नोंदणी करता येणार आहे. तसंच यावर लसीकरणाचा वेग अवलंबून असेल. नोंदणी करताना लसीकरणासाठी वेळ निश्चित करणं अनिवार्य आहे. लसीकरण केंद्रांवर गोंधळ वाढण्याची शक्यता असल्याने नोंदणी आवश्यक आहे. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ऑनसाइट रजिस्ट्रेशनचा अर्थात नोंदणी केंद्रावर जाऊनही नाव नोंदणी करण्याचा पर्याय अगोदरप्रमाणेच खुला असेल.

coWIN पोर्टलद्वारे रजिस्ट्रेशनसाठी…

सर्वात आधी https://selfregistration.cowin.gov.in/ वर जा. आपला मोबाइल नंबर टाका. त्यानंतर Get OTP वर क्लिक करा. ओटीपी मिळाल्यानंतर त्याला एन्टर करा. नंतर ‘Verify’ वर क्लिक करा. यानंतर ‘Register for Vaccination’ पेजवर आपला फोटो आयडी प्रूफ, नाव, जेंडर आणि जन्मतारीख सोबत सर्व माहिती भरा. यानंतर तुम्हाला अपॉइंटमेट शेड्यूल करण्याचा ऑप्शन मिळेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ‘Schedule’ बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही तुमचा पिनकोड टाका, सर्च वर क्लिक करा. या पिन कोड सोबत सेंटर दिसतील. तुमच्या हिशोबाप्रमाणे सेंटर, डेट आणि टाइमची निवड करून ‘Confirm’वर क्लिक करा.

Aarogya Setu अॅपवरून रजिस्ट्रेशनसाठी…

 Aarogya Setu अॅपला ओपन करा. होम स्क्रीनवर देण्यात आलेले कोविन टॅबवर क्लिक करा. यानंतर Vaccination Registration ला सिलेक्ट करा. त्यानंतर आपला फोन नंबर एन्टर करा. त्यानंतर एक ओटीपी येईल. तो एन्टर करा. नंतर ‘Register for Vaccination’ ओपन होईल. तुम्ही सर्व माहिती एन्टर करा. फोटो आयडी प्रूप, नाव, जेंडर, जन्मतारीख सर्व एन्टर करून ‘Register’ वर क्लिक करा. यानंतर अपॉइंटमेटला शेड्यूल करण्याचा ऑप्शन मिळेल. या ठिकाणी ‘Schedule’ बटनवर क्लिक करा. यानंतर एक एरियाचा पिन कोड टाका अन् सर्चवर क्लिक करा. उपलब्ध सेंटर दिसतील. त्यात टाइमला सिलेक्ट करून Confirm वर क्लिक करा. तुमचे अपॉइंटमेंट बुक होईल.

रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्यूमेंट्स

रजिस्ट्रेशन करताना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायविंग लायसन्स, (MGNREGA) जॉब कार्ड, MPs/MLAs/MLCs कडून देण्यात आलेले ओळखपत्र, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्ड, पासपोर्ट, पेंशन दस्तावेज, बँक / पोस्ट ऑफिस कडून देण्यात आलेले पासबुक आणि केंद्रीय / राज्य सरकार / सार्वजनिक लिमिटेड कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्राचा वापर करू शकता.

हेही महत्त्वाचे…

  • एकाच मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने तुम्हाला जास्तीत जास्त चार लाभार्थींची नावं जोडता येतील.
  • तुमच्या सोयीप्रमाणे लसीकरणासाठी तारीख आणि वेळ निवडू शकाल.

लसीची किंमत…

सरकारी केंद्रांवर तुम्हाला मोफत लस मिळेल. मात्र, खासगी केंद्रावर पैसे मोजावे लागतील. १ मेपासून खासगी रुग्णालयांना थेट लस निर्मात्या कंपन्यांकडून डोस खरेदी करावे लागतील. खासगी रुग्णालयांना कोव्हिशिल्डच्या प्रत्येक डोससाठी ६०० रुपये तर कोव्हॅक्सिनच्या प्रत्येक डोससाठी १२०० रुपये मोजावे लागणार आहेत. राज्यांना आता केंद्राकडून लस मिळणार नाहीत तर थेट लसनिर्मात्या कंपन्यांकडून लसीचे डोस खरेदी करावे लागणार आहेत. राज्य सरकारला कोव्हिशिल्डच्या एका डोससाठी ४०० रुपये तर कोव्हॅक्सिनच्या एका डोससाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु, नागरिकांना मात्र सरकारी रुग्णालयांत लस मोफत दिली जाणार आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: