Buldana Live Special : नारायण राणेंना कोंबडी चोर का म्‍हणतात?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांना काल अटकही झाली आणि लगेच जामिनही मिळाला. काल राज्यभर आणि आजही ठिकठिकाणी शिवसेनेतर्फे राणेंच्या विरोधात आंदाेलने केली जात आहेत. या आंदोलनांत राणेंचा उल्लेख कोंबडी चोर असा केला जात आहे. केवळ आताच नाही तर यापूर्वीही जेव्हा केव्हा राणेंचा विषय शिवसेनेने …
 
Buldana Live Special : नारायण राणेंना कोंबडी चोर का म्‍हणतात?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्‍तव्‍यामुळे चर्चेत आहेत. त्‍यांना काल अटकही झाली आणि लगेच जामिनही मिळाला. काल राज्‍यभर आणि आजही ठिकठिकाणी शिवसेनेतर्फे राणेंच्‍या विरोधात आंदाेलने केली जात आहेत. या आंदोलनांत राणेंचा उल्लेख कोंबडी चोर असा केला जात आहे. केवळ आताच नाही तर यापूर्वीही जेव्‍हा केव्‍हा राणेंचा विषय शिवसेनेने घेतला तेव्‍हा प्रत्‍येक वेळी त्‍यांचा उल्लेख कोंबडी चोर असा झाला आहे. पण राणेंना कोंबडी चोर का म्‍हणतात, हे मात्र कदाचित सध्याच्‍या नव्या दमाच्‍या शिवसैनिकांनाही माहीत नसेल. नेते घोषणा देतात म्‍हणून तेही घोषणा देतात. आता शिवसैनिकांनाच माहीत नाही म्‍हटल्‍यावर सामान्य वाचकांना काय कल्पना असेल, नाही का? बुलडाणा लाइव्हने शिवसेनेच्‍या काही वरिष्ठ नेत्‍यांसोबत यावर चर्चा केली. त्‍यावर अत्‍यंत मिश्कीलपणे हसत त्‍यांनी “कोंबडी चोर’ का म्‍हटले जाते हे सांगितले…

नारायण राणे आणि हनुमंत परब यांचा चेंबूरमध्ये एचएन चिकन शॉप नावाने कोंबड्या विक्रीचा व्यवसाय होता. एच म्‍हणजे हनुमंत आणि एन म्‍हणजे नारायण असा दोघांच्‍या नावाचा बोर्ड दुकानावर होता. आजही हे दुकान कायम आणि सुरळीत सुरू आहे, हे विशेष. दोघेही चेंबूरमध्ये गुंडगिरी करायचे. जेव्‍हा शिवसेनेकडून सदस्यत्‍व नोंदणी सुरू झाली तेव्‍हा राणे १५ वर्षांचे होते आणि सदस्य नोंदणीसाठी वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक होते. सदस्य होण्यासाठी राणेंनी स्वतःचे वय लपवून अर्जावर १८ लिहिले होते. त्‍यानंतर बाळासाहेबांच्‍या प्रत्‍येक सभेला नारायण आणि हनुमंत यांची जोडी हजर असायची. दोघे बाळासाहेबांना एकच हार घालायचे.

यातून बाळासाहेबांचे लक्ष राणेंकडे वेधले गेले. कोंबडी चोर का म्‍हणतात हा किस्सा गंमतीदार आहे. कोंबडीचा व्यवसाय असल्याने राणे आणि परब यांना कोंबड्या लागायच्या, त्या ते सोलापूर जिल्ह्यातील आठवडे बाजारांतून आणायचे. शेतकऱ्यांकडून ते कोंबड्या विकत घ्यायचे. पूर्वी कोंबड्यांसाठी खुराडे होते. बराचशा कोंबड्याही सारख्या दिसायच्या. परब आणि राणे विकत घेतलेल्या कोंबड्या या तात्‍पुरत्या खुराड्यांत ठेवायचे. मात्र त्‍याचवेळी एखादी दुसऱ्या शेतकऱ्याच्‍या खुराड्यातून निसटलेली कोंबडी राणे मोठ्या हुशारीने पकडून आपल्या खुराड्यात टाकायचे. एकदा राणे अशी चोरी करताना पकडलेही गेले होते. राणे आणि परब चेंबूरमध्ये चित्रपटाची तिकिटे ब्‍लॅकमध्येही विकायचे. एकदा दोघांना पोलिसांनी पकडले होते.

तेव्‍हा शिवसेना नेते लीलाधर डाके यांनी त्‍यांना सोडवले होते. बाळासाहेबांनी राणेंतील काही गुण (कदाचित अवगुणही) हेरले आणि शिवसेनेत महत्त्वाचे स्‍थान द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला चेंबूरमधून तिकिट देत राणेंना नगरसेवक केले. त्‍यानंतर पायऱ्या चढत, बाळासाहेबांचा सच्चा सैनिक असा मान मिळवत राणेंनी मुख्यमंत्रीपदापर्यंत बाजी मारली. मात्र नंतरच्‍या काळात उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले आणि राणेंचे बिनसले. त्‍यांचा उद्धवना कार्याध्यक्ष करण्यास विरोध होता. त्‍यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेत बोलताना या कोंबडी चोराला मुख्यमंत्री करून चूकच केली, असे उद्‌गार काढले. तेव्‍हापासून राणेंना कोंबडी चोर हे बिरुद चिकटले ते अगदी काल-आजच्‍या आंदोलनातही कायम आहे.