Chain snatching… मागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराचा महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळ!; बुलडाणा- मोताळा रस्‍त्‍यावरील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः मागून आलेल्या दुचाकीस्वाराने दुचाकीवरील महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही खळबळजनक घटना बुलडाणा- मोताळा रस्त्यावरील खडकी फाट्याजवळ 30 मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनी सांगितले, की गणेश श्यामराव गावंडे (रा. दाताळा, ता. मलकापूर) हे पत्नी, मुलाला घेऊन मोटारसायकलने बुलडाणा येथील डॉ. हिरे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी येत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः मागून आलेल्या दुचाकीस्वाराने दुचाकीवरील महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही खळबळजनक घटना बुलडाणा- मोताळा रस्‍त्‍यावरील खडकी फाट्याजवळ 30 मे रोजी सकाळी साडेनऊच्‍या सुमारास घडली.

पोलीस सूत्रांनी सांगितले, की गणेश श्यामराव गावंडे (रा. दाताळा, ता. मलकापूर) हे पत्‍नी, मुलाला घेऊन मोटारसायकलने बुलडाणा येथील डॉ. हिरे यांच्‍या दवाखान्यात उपचारासाठी येत होते. खडकी फाटा ओलांडून थोड्या अंतरावर जात नाही तोच मागून आलेल्या दुचाकीस्‍वाराने त्‍यांच्‍या पत्‍नीच्या गळ्यातील राजा-राणी मंगळसूत्र असलेली सोन्याची पोत (वजन 9 ते10 ग्राम, किंमत अंदाजे 40000 रुपये) मागून हात घालून तोडली.

त्‍यानंतर तो बुलडाणाकडे पळून गेला. काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल तो चालवत होता. त्‍याने फुल बाह्याचे लाल शर्ट घातला होता. तोंडाला पांढरा रुमाल बांधलेला, मजबूत शरीर बांधा असलेला, डोक्याचे केस काळे असलेला व वय अंदाजे 25 ते35 वर्ष दरम्यान होता. गणेश गावंडे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. त्‍याचा शोध घेतला जात आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. रोकडे करत आहेत.