Contact us

मनोज सांगळे
संपादक /समूह सल्लागार

बुलडाणा लाइव्हचे संचालक मनोज सांगळे गेल्या 18 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांनी देशोन्नती (बुलडाणा), लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, दिव्य मराठी (औरंगाबाद) अशा वृत्तपत्रांच्या संपादकीय विभागात उपसंपादक, मुख्य उपसंपादक म्हणून काम केले आहे. सध्या ते औरंगाबादेत पत्रकारिता करत असून, आपल्या मातृजिल्ह्याचे काहीतरी देणं लागतो, या उद्देशाने त्यांनी आपल्या मूळ जिल्ह्यासाठी बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट सुरू केली आहे. 24 एप्रिल 2020 ला त्यांनी बुलडाणा लाइव्हचे लोकार्पण केले. तो काळ असा होता की कोरोना रुग्णांबद्दलच्या अफवा पसरत होत्या. त्यावेळी प्रशासनाचीही सत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात तारांबळ उडत होती. अशा परिस्थितीत प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांशी समन्वय ठेवून या वेबसाईटने सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचली. याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता या वेबसाईटला मिळत गेली. आजही जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना घडामोडी तातडीने वाचकांपर्यंत विश्‍वासाहर्तने पोहोचविणारी न्यूज वेबसाईट म्हणून बुलडाणा लाइव्हकडे पाहिले जाते. आजघडीला बुलडाणा लाइव्हचे वाचक एक लाखाहून अधिक आहेत. एक कोटी पेज व्ह्यूजचा आकडा बुलडाणा लाइव्हने ओलांडला आहे. गुगल अ‍ॅडसेन्स, अ‍ॅडझेब्रा, एमगिड सारख्या आंतरराष्ट्रीय जाहिरात एजन्सीजनाही या वाचकसंख्येची भुरळ पडून त्यांनी बुलडाणा लाइव्हचे जाहिरात पार्टनर झाल्या आहेत.

REG. No. MAH-04-0035794

कार्यकारी संपादक ः धनसिंह सूर्यवंशी
सहसंपादक ः अरविंद देशमुख

संपर्क :
संपादकीय :
8888010046
जाहिरात ः
9850877896
बुलडाणा लाइव्ह कार्यालय ः बुलडाणा लाइव्ह, बुलडाणा अर्बन बँकेच्यावर, चिखली रोड, बुलडाणा
ई-मेल ः buldanalive@gmail.com

 
 
Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: