कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Corona Update : कोरोनाचे आणखी 2 बळी, बुलडाण्यातील महिला, पिंपळगाव देवीच्‍या पुरुषाचा मृत्‍यू, जिल्ह्यात बाधितांचा आकडा 23 हजार पार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 मार्चला कोरोनाने आणखी दोन बळी घेतले. उपचारादरम्यान केशवनगर, बुलडाणा येथील 65 वर्षीय महिलेचा आणि पिंपळगाव देवी (ता. मोताळा) येथील  69  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात नवे 755 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, 432 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3026 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2271 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 755 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 659 व रॅपीड टेस्टमधील 96 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1891 तर रॅपिड टेस्टमधील 380 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 67, बुलडाणा तालुका :  नांद्राकोळी 1, सुंदरखेड 4, कोलवड 7, पांगरी 2, शिरपूर 2, पिंपळगाव सराई 5, साखळी खुर्द 1, रायपूर 1, दुधा 2, उबळखेड 1, मढ 1, कोळेगाव 2, मासरुळ 1, पोखरी 2, गिर्डा 1, सव 2,  सातगाव 1, माळविहिर 1,  खामगाव शहर : 40, खामगाव तालुका : लोखंडा 1, गोंधनपूर 3, , पळशी बुद्रूक 1, वर्णा 1, पिंपरी गवळी 8, टाकळी 1, पिंपळगाव राजा 2, विहीगाव 3, हिवरा खुर्द 4, लाखनवाडा 1,शेलोडी 1, आवार 1, जयपूर लांडे 1,  नांदुरा तालुका : खैरा 1, तांदुळवाडी 1, पोटळी 3, टाकरखेड 5, मामुलवडी 1, महाळुंगी 3, निमगाव 7, पातोंडा 1, वाळती 1, नरखेड 1, शेंबा 3, जवळा बाजार 2,  मलकापूर शहर : 4, मलकापूर तालुका : निमखेड 1, खामखेड 1,  चिखली शहर : 64,  चिखली तालुका : शेलसूर 1, सावरगाव डुकरे 3, किन्होळा 4, एकलारा 3, ढासळवडी 3, धानोरी 2, धोत्रा नाईक 1, खैरव 19, मन्मोडी 1, टकारखेड 4, कोनाड 1, वळती 3, भानखेड 2, सवडत 2, पेनसावंगी 1, दहिगव 1, मेंडगाव 2, सोमठाणा 2, खंडाळा 3, भालगाव 1, कोलारा 3, अमडापूर 3, सवणा 1, डोंगर शेवली 1, चांधई 1,  सिंदखेड राजा शहर : 7, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 4, विझोरा 2, उगला 1, शेळगाव राऊत 2, शेंदुर्जन 3, जऊळका 4, गुंज 3, पिंपरखेड 1,  मोताळा तालुका :  उऱ्हा 2, पुन्हई 2, तरोडा 1, पिंपळगाव देवी 1, कोथळी 1, धामणगाव बढे 4, जनुना 7, सारोळा मारोती 7, आडविहिर 1, मोताळा शहर : 8, शेगाव शहर : 62, शेगाव तालुका : चिंचोली 4, गौलखेड 2, खेर्डा 2, वरखेड 1, जवळा 1, तींत्राव 1, सगोडा 1, जानोरी 1, पहुरजिरा 1,  संग्रामपूर तालुका : सोनाळा 4, रुधणा 1, जळगाव जामोद शहर : 8, जळगाव जामोद तालुका : कुरणगड बुद्रूक 1, खांडवी 2, आसलगाव 5, धानोरा 5, सुलाज 1, पळसखेड 1, सुनगाव 3, पिंपळगाव काळे 2, वाडी 1, मदाखेड 1, जामोद 1,  देऊळगाव राजा शहर : 57, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहागीर 8, उमरड 1, धानोरा 1, आळंद 2, पिंपळगाव चि. 1, हिवरखेड 4, मेहुणा राजा 1, अंभोरा 1, चिंचोली बुद्रूक1, पिंपरी आंधळे 1, लोणार शहर : 27, लोणार तालुका : पिंपळनेर 1, नांद्रा 2, बिबी 1, शिवणी पिसा 1,  मेहकर शहर : 22, मेहकर तालुका : राजगड 1, मोळा 2, हिवरा आश्रम 5, देऊळगाव माळी 2, कळमेश्वर 6, घाटबोरी 1, सारंगपूर 3, देऊळगाव साकर्षा 1, बोरखेडी 1, अंजनी बुद्रूक 1, लोणी गवळी 1, सोनाटी 2, नांदुरा शहर : 52,  मूळ पत्ता यवतमाळ 1, औरंगाबाद 1, कारंजा राम ता. बाळापूर जि अकोला 1, लोहारा ता. बाळापूर येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 755 रुग्ण आढळले आहेत.

432 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 432 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 42, सिध्दीविनायक हॉस्पिटल 28,  शेगाव : 23,  खामगाव : 85, नांदुरा : 26, देऊळगाव राजा : 42, चिखली : 44, मेहकर : 29, लोणार : 27, जळगाव जामोद : 37, सिंदखेड राजा : 34, मलकापूर : 23, संग्रामपूर : 12.

रुग्णालयांत 3440 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार

आजपर्यंत 155571 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 19862 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2846 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 23540 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या  रुग्णालयांत 3440 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. आजपर्यंत 208 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: