Corona Update : जिल्ह्याच्‍या ग्रामीण भागात फैलावतोय कोरोना!; छोट्या छोट्या गावांत आढळताहेत 15 वर पॉझिटिव्‍ह; मेहकरमध्ये पुरुषाचा मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 10 मार्चला कोरोनाने आणखी एक बळी घेतला असून, उपचारादरम्यान मेहकर येथील 54 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींचा आकडा 206 वर गेला आहे. दिवसभरात 385 नवे पॉझिटिव्हि रुग्ण आढळले असून, 262 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हजार-दोन हजार लोकसंख्येच्या छोट्या छोट्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 10 मार्चला कोरोनाने आणखी एक बळी घेतला असून, उपचारादरम्यान मेहकर येथील 54 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्‍यामुळे बळींचा आकडा 206 वर गेला आहे. दिवसभरात 385 नवे पॉझिटिव्‍हि रुग्‍ण आढळले असून, 262 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. हजार-दोन हजार लोकसंख्येच्‍या छोट्या छोट्या खेड्यांतही 15 वर पॉझिटिव्‍ह आढळत असल्याने आरोग्‍य यंत्रणा भांबावली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1161 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 776 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 385 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 303 व रॅपीड टेस्टमधील 82 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 415 तर रॅपिड टेस्टमधील 361 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 62, बुलडाणा तालुका : घाटनांद्रा 2,  इजलापूर 1, वरवंड 1, नांद्राकोळी 1, सुंदरखेड 6, कोलवड 1, पांगरी 1, शिरपूर 2, खामगाव शहर : 36, खामगाव तालुका : लोखंडा 1, गोंधनपूर 1, नागापूर 1, बोथाकाजी 1,  चिंचपूर 1, उमरा 10, पळशी बुद्रूक 3, वर्णा 6, नांदुरा तालुका : नारखेड 1, मलकापूर शहर : 57, मलकापूर तालुका : माकनेर 2, दुधलगांव 1, वडोदा 16, जांभूळधाबा 1, दाताळा 10, वाकोडी 1, वरखेड 6, चिखली शहर : 10,  चिखली तालुका : शेलूद 1, काटोडा 1, मेरा बुद्रूक 1,  कव्हळा 1, उंद्री 1, शेलसूर 1, सावरगाव डुकरे 1, किन्होळा 1, एकलारा 1, हातणी 2, शेलोडी 1, सिंदखेड राजा शहर : 4, सिंदखेड राजा तालुका : सोनुशी 1, धानोरा 1, पिंपरखेड 1, शेलगाव काकडे 1,  साखरखेर्डा 2, मोताळा तालुका : पोफळी 1, दाभा 1, कुऱ्हा 1, उऱ्हा 1,माकोडी 1, किन्होळा 1,  पुन्हई 1, शेलगाव बाजार 2, चावर्दा 1, तरोडा 6, पिंपळगाव देवी 17, पिं. गवळी 1, तालखेड 1, मोताळा शहर : 1, शेगाव शहर : 30, शेगाव तालुका : चावरा 1, गव्हाण 2, संग्रामपूर तालुका : टाकळी पंच 1,कतरगाव 1, जळगाव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : कुरणगड बुद्रूक 13, खांडवी 2, आसलगाव 1,  देऊळगाव राजा शहर : 10, देऊळगाव राजा तालुका : धोत्रा 1, लोणार शहर : 5, लोणार तालुका : सुलतानपूर 1, पिंपरी खंड 1,  मेहकर शहर : 2,  मूळ पत्ता वरूड ता. जाफराबाद जि. जालना 1, जाळीचा देव जि. जालना 2, नया अंदूरा ता. बाळापूर जि अकोला 2, औरंगाबाद 1, कारंजा राम ता. बाळापूर जि अकोला 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 385 रुग्ण आढळले आहेत.

262 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 262 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर नुसार सुटी देण्यात आलेले रुग्‍ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 31, स्त्री रुग्णालय 8, सहयोग हॉस्पीटल 4, शेगाव : 25,  खामगाव : 27, नांदुरा : 1,  दे. राजा : 6, चिखली : 24, मेहकर : 4, लोणार : 3, मोताळा : 1, जळगाव जामोद : 4, सिंदखेड राजा : 21, मलकापूर : 11, संग्रामपूर : 42.

3149 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आजपर्यंत 153300 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 19430 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 4605 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 22785 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 3149 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. आजपर्यंत 206 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.