कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Corona Virus Update : दिवसभरात कोरोनाने 3 बळी घेतले तरी जिल्‍हा बेफिकीर!; दिवसभरात बाधितांनी ओलांडला दोनशेचा आकडा!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने आज, 20 फेब्रुवारीला तिघांचे बळी घेतले असून, याबरोबरच बळींचा आकडा 186 वर गेला आहे. दिवसभरात उपचारादरम्यान सावळा (ता. सिंदखेड राजा) येथील 70 वर्षीय पुरुष, केळवद (ता. चिखली) येथील 75 वर्षीय पुरुष व गांधीनगर, चिखली येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, आज बाधित रुग्‍णसंख्येनेही दोनशेचा आकडा ओलांडला असून, नव्‍या 215 रुग्‍णांची भर पडली आहे. 101 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1030 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 815 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 215 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 156 व रॅपीड टेस्टमधील 59 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 456 तर रॅपिड टेस्टमधील 359 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 29, बुलडाणा तालुका : पोखरी 1, केसापूर 4, दुधा 1, करडी 2, शेगाव शहर : 11, खामगाव तालुका : घाणेगाव 1, सुटाळा बु 1, खामगाव शहर : 36, नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : पोटळी 3, संग्रामपूर तालुका : पळशी 1, सोनाळा 1, चिखली तालुका : हातणी 2, किन्होळा 3, टाकरखेड हेलगा 1, खैरव 2, चांधई 1, अंत्री 1, पळसखेड 1, गोद्री 3, पेनसावंगी 1, जांभोरा 1, अंचरवाडी 1, पिंपळगाव सोनाळा 1, मरखेडा 2, दे. घुबे 1, वळती 1, चिखली शहर : 23, मलकापूर शहर : 26, मलकापूर तालुका : उमाळी 1, मोताळा तालुका : सारोळा मारोती 1, सारोळा पीर 1, देऊळगाव राजा शहर : 7, देऊळगाव राजा तालुका : डोढ्रा 1, सिनगाव जहागीर 1, अंढेरा 1, मेहकर तालुका : कळमेश्वर 1, डोणगाव 1, जानेफळ 6, बऱ्हाई 3, मेहकर शहर : 2, सिंदखेड राजा शहर : 1, सिंदखेड राजा तालुका : शेंदुर्जन 1, जळगाव जामोद तालुका : सावरगाव 1, आसलगाव 3, झाडेगाव 2, लोणार शहर : 10, लोणार तालुका : पिंपळखुटा 1, सोनुना 1, अजिंठा जि. औरंगाबाद 1, चांदुर बाजार जि. अमरावती 1, अमरावती येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 215 रुग्ण आढळले आहेत.

101 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 101 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल 19, स्त्री रुग्णालय 12, अपंग विद्यालय 24, देऊळगाव राजा : 5, चिखली : 8, नांदुरा : 3, जळगाव जामोद : 7, मेहकर : 1, सिंदखेड राजा : 3, मलकापूर : 7, लोणार : 1, खामगाव : 8, शेगाव : 2, मोताळा : 1

आजपर्यंत 119196 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14496 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1922 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 119196 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 15845 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 1163 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 186 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

देऊळगाव राजात आठवडेबाजारात गर्दीच गर्दी… कोरोनाविषयक नियमांना ठेंगा

देऊळगाव राजा (राजेश कोल्‍हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने वारंवार सांगूनसुध्दा तालुक्यातील नागरिक ऐकायला तयार नाहीत. आज शनिवारी आठवडी बाजार होता. बाजार असल्याने मोठ्या संख्येने नागरिक देऊळगाव शहरात आले होते. मात्र ना सुरक्षित अंतर, ना मास्‍क, जिकडे तिकडे गर्दी असे चित्र दिसून आले. कोणत्याही दुकानावर खरेदी करण्यासाठी पाच व्यक्तींच्या वर लोक नसावे, असा आदेश आसताना सुध्दा अनेक किराणा, भाजीपाला ,फळविक्रेत्‍यांकडे मोठी गर्दी दिसून आली. प्रशासनाने सुध्दा याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते. नगरपरिषदेतर्फे सकाळी ९ ते ११ पर्यंत थातूरमातूर कारवाई करण्यात आली. वेळीच गांभीर्याने घेण्याची गरज असून, अन्यथा तालुक्‍यात लॉकडाऊनची गरज निर्माण झाली तर जबाबदार नागरिकच असतील, एवढे नक्‍की.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: