Corona Virus Update : कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजार पार; सवणा येथील पुरुषाचा मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 21 फेब्रुवारीलाही कोरोनामुळे होणाऱ्या बळींचे सत्र सुरूच राहिले. उपचारादरम्यान सवणा (ता. चिखली) येथील 80 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा 187 वर गेला आहे. दरम्यान, दिवसभरात 301 नवे कोरोनाबाधित आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 16146 वर गेली आहे. दरम्यान, 94 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 21 फेब्रुवारीलाही कोरोनामुळे होणाऱ्या बळींचे सत्र सुरूच राहिले. उपचारादरम्यान सवणा (ता. चिखली) येथील 80 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्‍यामुळे एकूण बळींचा आकडा 187 वर गेला आहे. दरम्‍यान, दिवसभरात 301 नवे कोरोनाबाधित आढळल्‍याने एकूण बाधितांची संख्या 16146 वर गेली आहे. दरम्‍यान, 94 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1536 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1235 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 301 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 232 व रॅपीड टेस्टमधील 69 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 666 तर रॅपिड टेस्टमधील 569 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 56, बुलडाणा तालुका : अजिसपूर 2, सागवान 4, सुंदरखेड 1, माळवंडी 1, शेगाव शहर : 5, खामगाव तालुका : घाटपुरी 1, सुटाळा 1, हिवरखेड 1, वरखेड 1, खामगाव शहर : 23, नांदुरा शहर : 3, चिखली तालुका : उंद्री 3, रायपूर 2, हातणी 1, गुंजळा 1, दहिगाव 1, सोमठाना 6, सावरगाव डुकरे 3, महिमळ 1, पिंपळगाव 1, गजरखेड 1, भोकर 1, रानुबाई 1, मेंडगाव 1, कोलारा 2, चांधई 1, टाकरखेड 2, पिंपळवाडी 1, अमडापूर 3, शेलूद 1, मुंगसरी 1, अंचरवाडी 9, मंगरूळ नवघरे 2, मालखेड 3, खैरव 1, चिखली शहर : 49, मलकापूर शहर : 1, मोताळा तालुका : भोरटेक 3, शेलापूर 1, देऊळगाव राजा शहर : 27, देऊळगाव राजा तालुका : पिंपळगाव 1, मेहुणा राजा 1, पिंपळनेर 1, किन्ही 1, नगणगाव 2, देऊळगाव मही 3, अंढेरा 1, मेहकर तालुका : डोणगाव 2, जानेफळ 9, अंजनी 1, हिवरा 2, मेहकर शहर : 2, सिंदखेड राजा शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : चिंचोली 1, साखरखेर्डा 4, किनगाव राजा 2, गरगुंडी 1, लोणार शहर : 19, लोणार तालुका : पिंपळनेर 1, सुलतानपूर 1, वेणी 1, मोताळा शहर : 6,शेगाव तालुका : तिव्हाण 1, भोनगाव 1, जवळा 1, धोलखेड जि. जालना 1, सवासानी जि. जालना 1, अकोट जि. अकोला 2, रामदास पेठ अकोला येथील 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 301 रूग्ण आढळले आहे.

94 रुग्‍णांची कोरोनावर मात

आज 94 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : स्त्री रुग्णालय 6, अपंग विद्यालय 13, देऊळगाव राजा : 14, चिखली : 35, नांदुरा : 2, जळगाव जामोद : 1, सिंदखेड राजा : 2, मलकापूर : 7, खामगाव : 3, शेगाव : 11.

1369 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 120431 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14590 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 3509 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 16146 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयांत 1369 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 187 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.