Corona Virus Update : जिल्ह्यात 13 बळी!; नव्‍या 554 बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी मृत्यूंचे तांडव मात्र सुरूच आहे. आज, 22 मे रोजी तब्बल 13 बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण 554 नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांचा आकडा 82336 वर गेला आहे. तालुकानिहाय आढळलेले रुग्ण ः बुलडाणा 152, खामगाव 103, देऊळगाव राजा 43, चिखली 44, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाचे रुग्‍ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी मृत्‍यूंचे तांडव मात्र सुरूच आहे. आज, 22 मे रोजी तब्‍बल 13 बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. एकूण 554 नव्‍या रुग्‍णांची भर पडल्‍याने एकूण बाधितांचा आकडा 82336 वर गेला आहे.

तालुकानिहाय आढळलेले रुग्‍ण ः बुलडाणा 152, खामगाव 103, देऊळगाव राजा 43, चिखली 44, मेहकर 50, मलकापूर 17, नांदुरा 32, लोणार 52, मोताळा 14, जळगाव जामोद 8, सिंदखेड राजा 14, संग्रामपूर 25.

13 मृत्‍यू

खामगावच्‍या सामान्य रुग्‍णालयात 3, बुलडाण्याच्‍या महिला रुग्‍णालयात 9, शेगावच्‍या सामान्य रुग्‍णालयात 1 असे 13 बळी गेल्या 24 तासांत गेले आहेत. एकूण बळींचा आकडा आता 558 वर गेला आहे. 782 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला असून, सध्या 4793 रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत.