Corona Virus Update : बुलडाणा शहरात 51, चिखलीत 33, देऊळगाव राजात 40, खामगावात 21 कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण!; 1623 बाधितांवर उपचार सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाचे भूत आता चांगलेच मानगुटीवर बसण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. सुदैवाने प्रशासनाने वेळीच उपाययोजना सुरू केल्याने हे भूत उतरेल, अशी शक्यता आहे. मात्र त्यासाठी खबरदारी प्रत्येकाला घ्यावीच लागणार आहे. आज, 22 फेब्रुवारीला 350 बाधितांची नोंद झाली. यात सर्वाधिक रुग्ण बुलडाणा शहरात 51, चिखलीत 33, देऊळगाव राजात 40, खामगावात 21 आढळले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाचे भूत आता चांगलेच मानगुटीवर बसण्याच्‍या प्रयत्‍नात दिसत आहे. सुदैवाने प्रशासनाने वेळीच उपाययोजना सुरू केल्याने हे भूत उतरेल, अशी शक्‍यता आहे. मात्र त्‍यासाठी खबरदारी प्रत्‍येकाला घ्यावीच लागणार आहे. आज, 22 फेब्रुवारीला 350 बाधितांची नोंद झाली. यात सर्वाधिक रुग्‍ण बुलडाणा शहरात 51, चिखलीत 33, देऊळगाव राजात 40, खामगावात 21 आढळले आहे. दरम्‍यान, 96 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1448 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1098 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 350 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 291 व रॅपिड टेस्टमधील 59 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 744 तर रॅपिड टेस्टमधील 354 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल
खामगाव शहर : 21, खामगाव तालुका : माक्ता 1, नांदुरा शहर : 19, नांदुरा तालुका : वाडी 1, निमखेड 1, टाकरखेड 1, बुलडाणा शहर : 51, बुलडाणा तालुका : केसापूर 1, भादोला 1, तराडखेड 1, दहीद बुद्रूक 1, माळवंडी 1, सागवन 5, सुंदरखेड 2, गिरडा 2, टाकळी 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : थार 1, डोणगाव 2, जानेफळ 2, बऱ्हाई 2, कुंबेफळ 1, देऊळगाव राजा तालुका : अंढेरा 10, आळंद 2, सिनगाव जहागीर 18, भिवगण 8, देऊळगाव राजा शहर : 40, सिंदखेड राजा शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : चिंचोली 1, पिंपळखुटा 2, दुसरबीड 1, चिखली शहर : 33, चिखली तालुका : टाकरखेड 1, अंचरवाडी 1, ईसोली 1, पिंपळवाडी 3, हातणी 3, वळती 1, अंत्री कोळी 4, जांभोरा 3, गुंज 1, मंगरूळ नवघरे 5, केळवद 2, धोत्रा भणगोजी 2, सवणा 3, पेठ 1, तेल्हारा 2, पिंपळगाव सोनाळा 2, मालखेड 1, गजरखेड 1, भोरसा भोरसी 1, मलकापूर शहर : 37, मलकापूर तालुका : पिंपळखुटा 1, लासुरा 2, जांबुळ धाबा 1, कुंड बुद्रूक 2, जळगाव जामोद शहर : 4, जळगाव जामोद तालुका : झाडेगाव 5, मोताळा शहर : 7, मोताळा तालुका : तळणी 1, लोणार तालुका : पिंपळनेर 1, हिरडव 1, लोणार शहर : 10, मूळ पत्ता कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव 1, मेरखेडा ता. जाफराबाद जि. जालना 1, जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना 1, डोलखेडा जि. जालना येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 350 रुग्ण आढळले आहे.

96 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 96 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्‍ण असे ः खामगाव : 4, बुलडाणा : सिद्धीविनायक कोविड हॉस्पीटल 2, अपंग विद्यालय 24, स्त्री रुग्णालय 3, देऊळगाव राजा : 9, चिखली : 15, लोणार : 4, शेगाव : 17, जळगाव जामोद : 3, मलकापूर : 5, मेहकर : 9, नांदुरा : 1.

1623 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 121529 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14686कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 3330 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 16496 कोरोनाबाधित रूग्ण असून, सध्या रुग्णालयात 1623 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 187 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.