कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Corona Virus Update : 32 वर्षीय युवक ठरला कोरोनाचा बळी!; एकूण बाधितांची संख्या 44 हजार पार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रामुख्याने वृद्धांचे बळी घेणाऱ्या कोरोनाने चांगेफळ (ता. मेहकर) येथील 32 वर्षीय युवकाचा बळी घेतल्‍याने आरोग्‍य यंत्रणेसमोरील चिंता वाढली आहे. दिवसभरात कोरोनाने 4 बळी घेतले असून, चांगेफळच्‍या युवकासह दहीद (ता. बुलडाणा) येथील 47 वर्षीय पुरुष, जयपूर (ता. मोताळा) येथील 65 वर्षीय पुरुष, भोरसा भोरसी (ता. चिखली) येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्‍यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात नवे 619 बाधित समोर आले असून, 784 रुग्‍णांना रुग्‍णालयातून सुटी मिळाली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5411 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4792 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 619 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 312 व रॅपीड टेस्टमधील 307 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 556 तर रॅपिड टेस्टमधील 4236 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 98, बुलडाणा तालुका :गोंधनखेड 1, मासरूळ 1, कुलमखेड 2, डोमरूळ 2, टाकळी 1, धाड 3, जांब 1, रूईखेड 2,  पिंपळगाव सराई 2, सागवन 1, सावळी 5, म्हसला 1, कुंबेफळ 1, चांडोळ 1, करडी 1, रायपूर 5,  मोताळा शहर :6 , मोताळा तालुका : पिंपळगाव देवी 2, शेलापूर 1, निपाणा 1, माळेगाव 1, आव्हा 3, उऱ्हा 2, धानखेड 1, वरूड 1, जयपूर 5, पुन्हई 1, उबाळखेड 2, मूर्ती 1, रोहिणखेड 3, धामणगाव बढे 6, किन्होळा 1, खामगाव शहर : 46,  खामगाव तालुका : अंत्री 1, सुटाळा 3, पारखेड 1, टेंभुर्णा 1,  गणेशपूर 1, बोरजवळा 1, सज्जनपुरी 1, कोलोरी 1, रोहणा 1, हिवरा 2,  आंबेटाकळी 1, शेगाव शहर : 26,  शेगाव तालुका : मानेगाव 1, पहुरजिरा 1, मोरगाव 1, खेर्डा 1, टाकळी धारव 1, हिंगणा 1, मच्छींद्रखेड 1, गौलखेड 1, शिरसगाव 1, नागझरी 1, जवळा 1, माटरगाव 2, चिखली शहर : 8, चिखली तालुका : इसोली 1, मुरादपूर 1, शेलूद 3, अंत्री खेडेकर 12, चंदनपूर 1, रोहडा 1, खैराव 1, कोलारा 1,कनारखेड 1, माळशेंबा 2, पळसखेड नाईक 2,  मलकापूर शहर :73, मलकापूर तालुका : बहापुरा 1, वाघुड 1, देवधाबा 1, दुधलगाव 1,  वडोदा 1, घिर्णी 3, दाताळा 2, दसरखेड 1, भानगुरा 1, उमाळी 1, देऊळगाव राजा शहर : 33, देऊळगाव राजा तालुका : चिंचखेड 4, देऊळगाव मही 3, गोळेगाव 1, निमखेड 3, डोईफोडेवाडी 1, असोला 1, गिरोली 1, गोंधनखेड 1, बोरखेडी 1, अंढेरा 2, भिवगण 1, कव्हाळेवाडी 1, दिग्रस 1, सिनगाव जहा. 2, वाकी 1, सावंगी टेकाळे 1, सरंबा 1, सिंदखेड राजा शहर :2 , सिंदखेड राजा तालुका : वसंतनगर 1, सोयगाव 1, दुसरबीड 3, साखरखेर्डा 3, डावरगाव 1, आलापूर 1, मेहकर शहर : 21, मेहकर तालुका : खार 1, राजेगाव 1,  हिवरा आश्रम 1, देऊळगाव माळी 2, भालेगाव 1, गोमेधर 1, शेलगाव दे. 1, पांगरखेड 1, कनका 1, जनुना 1, डोणगाव 2, खापरखेड 1, सावरखेड 1, लोणी गवळी 2, संग्रामपूर तालुका : पळशी झाशी 2, वरवट बकाल 1, बोडखा 1, निवाणा 1, आलेवाडी 1,  जळगाव जामोद शहर :5, जळगाव जामोद तालुका : मडाखेड 1, निंभोरा 1, पिंपळगाव काळे 1, कुरणगड 1, नांदुरा शहर : 18, नांदुरा तालुका : डिघी 2, वडनेर 9, धानोरा 1, चांदूर बिस्वा 1,  लोणवडी 1, शेलगाव मुकूंद 3, टाकरखेड 2, पोटा 3, काटी 1, चिखली बुद्रूक 1, खुरकुंडी 1, माटोडा 1, आलमपूर 4, हिंगणे गव्हाड 3,  भरोडा 1, लोणार शहर : 6 , लोणार तालुका : सावरगाव 2,  पळसखेड 1, वेणी 1, घाटनांद्रा 1, जांभूळ 1, पिंपळनेर 1, टिटवी 5, बिबी 15, सुलतानूपर 8, वायसा 1, दाभा 2,  परजिल्हा सावळदबारा 1, औरंगाबाद 1, मंठा 2, बाळापूर 1, मोथा ता. मुक्ताईनगर 1, इटारसी मध्यप्रदेश 2, जालना 1, मोप जि. वाशिम 1, माहोरा ता. जाफराबाद 1, रिसोड 1 अशा प्रकारे जिल्ह्यात 619 रुग्‍ण समोर आले आहेत. आज 784  रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

5745 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 259044 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 38402 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 5081 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 44446 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या  रूग्णालयात 5745 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 299 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: