बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

Good News! जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 22 शाळा होणार आदर्श!

बुलडाणा (संजय मोहितेः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा )ः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा म्हणजे जीर्ण वा जुन्या रंगहीन इमारती, अस्वच्छता, प्राथमिक सुविधांचा अभाव असे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र जिल्ह्यातील किमान 22 शाळांचे हे दारिद्र्य संपणार असून, त्यांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा वरखेड, जिल्‍हा परिषद मराठी प्राथमिक शेळगाव अटोळ व सावरगाव डुकरे (ता. चिखली), जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा बायगाव खुर्द व आडोळ बुद्रुक ( दे,राजा) , मराठी प्राथमिक गवंढला व रायगाव (ता. खामगाव), जिल्हा परिषद शाळा टिटवी (ता. लोणार), मराठी प्राथमिक वडोदा व आळंद (ता. मलकापूर), जिल्हा परिषद शाळा कळंबेश्वर (ता. मेहकर), जिल्हा परिषद उर्दू शाळा मोताळा, जिल्हा परिषद बोराखेडी (मोताळा), जिल्हा परिषद शाळा अलमपूर (ता. नांदुरा), जिल्हा परिषद मराठी प्राथमिक व उच्च माध्यमिक संग्रामपूर, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक व उच्च माध्यमिक माटरगाव (ता. शेगाव) आणि जिल्हा परिषद मराठी प्राथमिक गोरेगाव (ता. सिंदखेड राजा) या शाळांची निवड करण्यात आली आहे.

या राहणार सुविधा…
व्हर्च्युअल वर्ग, संगणक कक्ष व ग्रंथालय, विद्यार्थ्यांची 5 वी स्कॉलरशीप परीक्षेची पूर्वतयारी, उत्कृष्ट शिक्षकांना देश- विदेशात प्रशिक्षण, अग्निशमन यंत्रणा, पेयजल हँडवाश स्टेशन, आकर्षक इमारत, शाळेतच अंगणवाडी इमारत आदी.

खोडा की दुधात मिठाचा खडा?
दरम्यान शासनाने आणलेली योजना स्तुत्य असली तरी ( तिजोरीत ठणठणाट असल्याने की काय) यासाठी कोणताही निधी मिळणार नाहीये! शाळांचा हा सर्व विकास लोकसहभाग (स्पष्ट भाषेत सांगायचे म्हणजे वर्गणी) किंवा उद्योग, संस्था यांच्या मदतीने अर्थात सीएसआर अंतर्गत खर्च करावा असे निर्देश देण्यात आले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: