Good News! आमदार श्वेताताई महाले यांच्‍या प्रयत्‍नांमुळे सिंचन, पाझर तलाव दुरुस्तीसाठी 1 कोटी 38 लक्ष रुपये मंजूर

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांमुळे काल चिखली शहराच्या हद्दीवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची गोड बातमी ताजी असतानाच, आज 31 मार्चला आणखी एक गोड बातमी त्यांच्या प्रयत्नांमुळे चिखली तालुकावासियांना ऐकायला मिळाली आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील पाझर तलाव, सिंचन तलाव आणि गाव तलावांच्या दुरुस्तीसाठी निधी नसल्याने अनेक गाव , पाझर व सिंचन …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखलीच्‍या आमदार श्वेताताई महाले यांच्‍या प्रयत्‍नांमुळे काल चिखली शहराच्‍या हद्दीवाढीच्‍या प्रस्‍तावाला मान्यता मिळाल्‍याची गोड बातमी ताजी असतानाच, आज 31 मार्चला आणखी एक गोड बातमी त्‍यांच्‍या प्रयत्‍नांमुळे चिखली तालुकावासियांना ऐकायला मिळाली आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील पाझर तलाव, सिंचन तलाव आणि गाव तलावांच्या दुरुस्तीसाठी निधी नसल्याने अनेक गाव , पाझर व सिंचन तलावांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. दुरुस्तीसाठी निधीची दिवसांपासूनची मागणी होती.  आमदार श्वेताताई महाले यांनी या प्रकरणी लक्ष घालून चिखली मतदारसंघातील जवळपास 17 पाझर तलाव,  सिंचन तलाव आणि गाव तलावांसाठीच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 38 लक्ष रुपयांच्या कामांना मान्यता मिळवली आहे.

अमडापूर सिंचन तलाव क्रमांक 2 (खर्च 38 लक्ष रुपये), केळवद पाझर तलाव क्रमांक 2  (18 लक्ष रुपये), महोदरी पाझर तलाव 20 लक्ष रुपये, शेलगाव जहाँगीर पाझर तलाव 20 लक्ष रुपये, वाघापूर गाव तलाव 27 लक्ष रुपये, साकेगाव गाव तलाव 11 लक्ष रुपये, गोदरी गाव तलाव क्रमांक 2 (खर्च 29 लक्ष रुपये), मातला सिंचन तलाव 20 लक्ष रुपये, शिरपूर पाझर तलाव 16 लक्ष रुपये, आवळखेड पाझर तलाव 29 लक्ष रुपये, दुधा गाव तलाव 5 लक्ष रुपये, मातला गाव तलाव 20 लक्ष रुपये, अटकळ गाव तलाव 22 लक्ष रुपये, शिरपूर गाव तलाव 16 लक्ष रुपये, मोहज पाझर तलाव क्रमांक 1 (खर्च11 लक्ष रुपये), मोहोज  पाझर तलाव क्रमांक 2 (खर्च 9 लक्ष रुपये) अशा जवळपास एक कोटी 38 लक्ष रुपयांच्या पाझर सिंचन व गाव तलावांच्या दुरुस्तीसाठी आता निधी उपलब्ध झाल्याने या तलावांची लवकरच दुरुस्त होईल. यामुळे सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांना या तलावांचा चांगला फायदा होणार आहे. मतदारसंघात नादुरुस्त अनेक तलाव असून त्यांच्या दुरुस्ती साठी टप्प्याटप्प्याने  निधी उपलब्ध होणार आहे.