Good News! जिल्ह्यातून धावणार हायस्पीड बुलेट ट्रेन; नागपूर- मुंबई अवघ्या तीन तासांत; जिल्ह्यातील 1245 हेक्टर जमीन लागणार; जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील खामगाव- जालना रेल्वे मार्ग कधी होईल हे सांगता येणार नसले तरी आता जिल्ह्यातून चक्क बुलेट ट्रेन धावणार आहे. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला लागूनच ही बुलेट ट्रेन जाणार आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांमधून ही ट्रेन धावणार असून, यासंबंधीची राज्यातील पहिलीच बैठक आज, 22 जुलै रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. नागपूर- …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील खामगाव- जालना रेल्वे मार्ग कधी होईल हे सांगता येणार नसले तरी आता जिल्ह्यातून चक्क बुलेट ट्रेन धावणार आहे. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला लागूनच ही बुलेट ट्रेन जाणार आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांमधून ही ट्रेन धावणार असून, यासंबंधीची राज्यातील पहिलीच बैठक आज, 22 जुलै रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात येत असतानाच सरकारने आता या मार्गालगतच मुंबई- नागपूर हायस्पीड ट्रेनचा प्रकल्प हाती घेतला आहे. बैठकीत हायस्पीड ट्रेनचे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रेझेन्टेशन करण्यात आले. यावेळी प्रशासन व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे…

  • 350 कि.मी. प्रति तास वेगाने धावणार ट्रेन.
  • एकावेळी जास्तीत जास्त 750 प्रवास करू शकतील.
  • मेहकर येथे होणार रेल्वे स्टेशन.
  • बुलडाणा जिल्ह्यातील 47 गावांमधून जाणार बुलेट ट्रेन.
  • जिल्ह्यातून 87 कि.मी. धावणार.
  • जमिनीची होईल थेट खरेदी.
  • शहरात अडीच टक्के, ग्रामीण भागातील जमिनीची रक्कम पाचपटीने देणार.